Followers

Friday, December 31, 2010

" नवा गाडी ... नवा राज्य"




परवाच एका मस्त नवीन मराठी नाटक पाहायचा योग आला. नाटकाचा नाव होता " नवा गाडी ... नव राज्य". शुभंकरोती ची थोडीशी टीम म्हणजे उमेश कामत, प्रिया बापट आणि हेमंत ढोमे यात असल्याने एकदम उत्साह निर्माण झाला आणि नाटकाचा योग जुळून आला. नवीन लग्न झाल्येल्या नव्या जोडप्याची ही एक कहाणी. या पूर्वी अशी अनेक नाटके मराठी रंगभूमीवर आली असल्याने यात काय विशेष असा प्रश्न कोणालाही साहजिकच पडेल. पण यात नावाप्रमाणे बराच काही नवीन आहे एवढं नक्की....

या नाटकाची सुरुवात होते ते ४ महिन्या पूर्वी लग्न झालेल्या ऋषी (उमेश कामत) आणि अमृता (प्रिया बापट) या एका नवीन जोडप्याने. लग्न झाल्या झाल्या काही दिवस इंग्लंड मध्ये राहून आलेले हे जोडपे येथे पण एकदम खुशीत आहे. दोघांमध्ये ८ वर्षाचे अंतर असले तरी तो तिला एकदम फुलासारखे जपत असतो आणि ती पण तिचा नवरा या नात्याने त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असते. आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यात तिचा एक जुना मित्र हिम्मत राव (हेमंत ढोमे) अवतरतो आणि तिथून या दोघांमध्ये ठिणग्या पडायला सुरुवात होते. हिम्मत राव हा एक शास्त्रज्ञ असून तो फुलपाखरांवर संशोधन करत असतो. उमेश ला आवडत नाही म्हणून प्रिया हेमंत ला घरी येण्यास बंदी घालते. याच काळात उमेश च्या ऑफिस मध्ये त्याची एक जुनी मैत्रीण केतकी (उर्जा देशपांडे) रुजू होते. येथूनच संशय आणि इतर गोष्टी सुरु होतात. या सर्व घडामोडींचा शेवट काय होतो हे नाटकातच पाहिलेले बरे....

या नाटकाचा विषय नावाप्रमाणेच ताजा आहे आणि कलाकार सुद्धा. उमेश ने रंगवलेला नवरा फारच सुंदर. प्रियाने अल्लड मुलीचे केलेले काम फारच सुंदर. सर्वात कमाल केली आहे ती हेमंत ने. हिम्मत राव या गावरान माणसाचे बेअरिंग त्याने इतके मस्त घेतले आहे की बस. त्याने अक्खे नाटक त्यामुळे फारच खुमासदार बनवलेले आहे. उर्जा चा नवखे पणा मात्र सारखा जाणवत राहतो. तिचं शब्दोच्चारण चांगला आहे पण डोळे आणि शरीर फारसा हलत नाही ! तसेच नाटकात विसरा विसरी ही तिने विसरायला हवी. पाठांतर हा तर नाटकाचा प्राणच....


लेखक क्षितीज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी पण एक चांगला प्रयत्न केला आहे. प्रसाद वालावलकर चे नेपथ्य ही लक्षात राहील असं आहे. संपूर्ण घर गच्ची सकट छान सजवलं आहे. सर्वात लक्षात राहते ते ऋषिकेश कामेरकर याचे संगीत आणि त्याचे गाणं. ..." नवा गाडी ...राज्य नवं...."

Sunday, September 5, 2010

हाडशी






नुकताच पुण्याजवळ हाडशी येथे जाण्याचा योग आला. एकदम मस्त ठिकाण आहे....





Thursday, July 1, 2010

भारतीय योग विद्या धाम - सुवर्ण महोत्सव

नुकताच "भारतीय योग विद्या धाम " या संस्थेचा सुवर्ण महोत्सव पुण्यात मोठ्या शानदार पद्धतीने साजरा झाला. योग विद्या धामचा एक जुना कार्यकर्ता म्हणून मलाही या कार्यक्रमाचे आमंत्रण होते. तसा मला नगर हून आदेश वजा फोनच आला होता. त्या दिवशी वेळात वेळ काढून तेथे जायचेच असा निश्चय केला होता.

तेथे पोहोचल्यावर त्या ठिकाणी जमलेल्या सर्व मंडळी आणि कार्यकर्ते यांची भाऊ गर्दी पाहून माझे मन कधी इतिहासाच्या आठवणीत रमायला लागले ते मला कळलेच नाही. मी साधारण पणे १९९० मध्ये सर्व प्रथम या संस्थेमध्ये माझा पहिला वर्ग केला आणि नंतर एक एक परिक्षा पार करत मी संस्थेचा कार्यकर्ता कसा झालो ते मला कळलेच नाही. सुरुवातीची काही वर्षे नगर शाखे मध्ये काम करताना शर्माजी, दत्ता दिकोंडा सर, भंडारी सर, एकबोटे काकू, वाईकर यांच्या बरोबर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना दिवस कसे गेले ते कळलेच नाही. आमची "योग प्रबोध" ची नगर शाखेची पहिली बैच, त्या वेळच्या गमती-जमती सगळे डोळ्या समोर तरळून गेल्या. तद नंतर मला नोकरी निमित्त नाशिक मध्ये असताना तेथील शाखेतही काम करायला मिळाले. म्हणजे Head Office ला बदली झाल्या सारखेच.... गुरुवर्य मंडलिक सरांच्या परवानगीने मी संस्थेच्या इमारतीतच राहत होतो. तेथे संस्थेची केलेली दिवस रात्र कामं, "योग सुगंध " अंकासाठी केलेले कष्ट, रोज भल्या पाहते उठून कुठला कुठला वर्ग घ्यायचा .... मग तो योग प्रवेश चा असुदे नाहीतर योग संजीवन चा. कधी योग परिचय पण घ्यायचा तर कधी गोर्या विध्यार्थ्यांसाठी योग प्रवेश चक्क इंग्लिश मधून.....

"ओंकार ज्ञान यज्ञ" आणि अशा सारख्या अनेक उपक्रमात सक्रीय सहभागी मला होता आलं त्या बद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. पौर्णिमा ताईंनी केलेलं पोटच्या मुला सारखा प्रेम आणि त्यांच्या घरातील "ध्यान मंदिरात" माझ्या परीने केलेली थोडीफार साधना तर मी कधीच विसरू शकणार नाही. गुरुवर्य मंडलिक सर, पौर्णिमा ताई आणि नाशिकच्या कार्यकर्त्यांनी दिलेले प्रेम आणि मार्गदर्शन यांनी मला माझ्या पुढील आयुष्यात खूपच उपयोगी पडलं.

नाशिक च्या त्या वास्तव्य नंतर मी इतका नशीबवान कि मला पिंपरी चिंचवड शाखेमाधेही काम करायची संधी मिळाली. निफाडकर सर, जोशी ताई, प्रभुणे काकू यांच्या बरोबर काम करताना फार मजा आली. ऐन कडाकाच्या थंडीत निगडी येथे डिसेंबर मध्ये पार्किंग मध्ये कुडकुडत घेतलेले वर्ग.... वेळात वेळ काढून "जिथे कमी तिथे आम्ही" या नियमाप्रमाणे घेतलेले वर्ग, सहशिक्षक म्हणून शिक्षकांनी केलेलं कौतुक आणि पाठीवरची थाप या मुळे मी येथेही माझ्या परीने शक्य तेवढे काम करू शकलो.

मी अशा फार थोड्या कार्यकर्त्यांपैकी असेन की ज्यांना किव्वा त्यापेक्षा जास्त शाखांमध्ये काम करायची संधी मिळाली असेल. या संमेलना निमित्त हे सारी मंडळी मला कित्ती कित्ती दिवसांनी भेटली काय सांगू !!!

या संस्थेनी आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांनी माझे जीवन जे समृद्ध केले त्या बद्दल मी त्यांचा शतश: आभारी आहे.....

Saturday, February 20, 2010

कबीर - शेखर सेन


नुकत्याच झालेल्या वसंतोत्सवात या वर्षी प्रथमच मला काम करायची संधी मिळाली आणि दिलेल्या कामा बरोबरच अनेक लाकार आणि त्यांचे कार्यक्रमही पाहता आले. सगळे कार्यक्रम चांगले झाले पण त्यात विशेष उल्लेख करायचा झाला तर एकाचा करता येईल तो म्हणजे शेखर सेन यांनी सदर केलेला "कबीर" हा एकपात्री कार्यक्रम.

अगदी खरं सांगायचं तर मी या पूर्वी "शेखर सेन"हे नाव कधीही ऐकले नव्हते. वसंतोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन करताना राहुल देशपांडे ने शेखर सेन यांचा कार्यक्रम ठेऊया असा आग्रह चालवला होता. सुरुवातीला आम्ही देखील थोडे चक्राऊन गेलो होतो पण राहुल ला मनात कुठेतरी प्रचंड विश्वास होता आणि म्हणूनच त्याने हा कार्यक्रम वसंतोत्सवात आयोजायचे ठरवले. मी स्वतः इंटरनेट वरून शेखर सेन यांची थोडीफार माहिती काढायचा प्रयत्न केला.

कार्यक्रमच्या आधी साधारण अर्धा तास या महाशयांनी स्टेजचा ताबा घेतला. त्याच्या सहकाऱ्यांनी स्टेजची व्यवस्था आणि लाईट ची सर्व व्यवस्था पार पडली आणि ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवात झाली. शेखर सेन यांनी कबीर यांच्या वरती तासांचा एकपात्री कार्यक्रम करणे का अजबच प्रकार होता.

कबीर स्वतः या भूमीवर येऊन आपले आत्म चरित्र सदर करतात अशी याची थीम आहे. या संपूर्ण एकपात्री कार्यक्रमात शेखर सेन जवळ पास ४० कबीराचे दोहे गातात आणि त्यांचे चरित्र पुढे नेतात. "कबीरा, जब हम पैदा हुवे.... जग हसे हम रोये" येथपासून त्यांनी कबीराचे दोहे ज्या ताकदाने गाईले त्याला तोड नाही..... सर्व दुह्यांचे संगीत track वर रेकॉर्ड करून त्यावर शेखर सेन यांनी ही गीते सदर केली आहेत. कबीराच्या जन्मापासून ते त्यांचे पूर्ण चरित्र ओघवत्या वाणीत आणि कबीराच्या दोह्यांची त्याला जोड देत त्यांनी चांगला रंगवला आहे. एकपात्री कार्यक्रम करण्यासाठी आवश्यक असलेली बंदिस्त आणि ताकदवान संहिता, त्याला जोडीला तेवढाच ताकदीचा अभिनय आणि त्यांनी सदर केलेले दोहे ह्या सगळ्याचा जो काही मिलाफ तयार झाले आहे तो काही औरच.....

स्टेजवरती अगदी कमीत कमी नेपथ्य पण त्याचाही मोठ्या चतुराईने वापर केला आहे. वेगवेगळ्या कोनातले lights आणि त्याचा केलेला प्रभावी वापर यामुळे हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवरजातो. कबीराचे संपूर्ण आयुष्य एका एका प्रसंगातून उलगडताना track वर दोहे न चुकता आणि न मागे पुढे होता सदर करणे हि नक्कीच सोपी गोष्ट नव्हे. जुनी कथा आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची दिलेली जोड याचा एक सुंदर संगम म्हणजे शेखर सेन यांनी सदर केलेला "कबीर" ......

http://www.shekharsen.com