Followers

Thursday, July 1, 2010

भारतीय योग विद्या धाम - सुवर्ण महोत्सव

नुकताच "भारतीय योग विद्या धाम " या संस्थेचा सुवर्ण महोत्सव पुण्यात मोठ्या शानदार पद्धतीने साजरा झाला. योग विद्या धामचा एक जुना कार्यकर्ता म्हणून मलाही या कार्यक्रमाचे आमंत्रण होते. तसा मला नगर हून आदेश वजा फोनच आला होता. त्या दिवशी वेळात वेळ काढून तेथे जायचेच असा निश्चय केला होता.

तेथे पोहोचल्यावर त्या ठिकाणी जमलेल्या सर्व मंडळी आणि कार्यकर्ते यांची भाऊ गर्दी पाहून माझे मन कधी इतिहासाच्या आठवणीत रमायला लागले ते मला कळलेच नाही. मी साधारण पणे १९९० मध्ये सर्व प्रथम या संस्थेमध्ये माझा पहिला वर्ग केला आणि नंतर एक एक परिक्षा पार करत मी संस्थेचा कार्यकर्ता कसा झालो ते मला कळलेच नाही. सुरुवातीची काही वर्षे नगर शाखे मध्ये काम करताना शर्माजी, दत्ता दिकोंडा सर, भंडारी सर, एकबोटे काकू, वाईकर यांच्या बरोबर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना दिवस कसे गेले ते कळलेच नाही. आमची "योग प्रबोध" ची नगर शाखेची पहिली बैच, त्या वेळच्या गमती-जमती सगळे डोळ्या समोर तरळून गेल्या. तद नंतर मला नोकरी निमित्त नाशिक मध्ये असताना तेथील शाखेतही काम करायला मिळाले. म्हणजे Head Office ला बदली झाल्या सारखेच.... गुरुवर्य मंडलिक सरांच्या परवानगीने मी संस्थेच्या इमारतीतच राहत होतो. तेथे संस्थेची केलेली दिवस रात्र कामं, "योग सुगंध " अंकासाठी केलेले कष्ट, रोज भल्या पाहते उठून कुठला कुठला वर्ग घ्यायचा .... मग तो योग प्रवेश चा असुदे नाहीतर योग संजीवन चा. कधी योग परिचय पण घ्यायचा तर कधी गोर्या विध्यार्थ्यांसाठी योग प्रवेश चक्क इंग्लिश मधून.....

"ओंकार ज्ञान यज्ञ" आणि अशा सारख्या अनेक उपक्रमात सक्रीय सहभागी मला होता आलं त्या बद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. पौर्णिमा ताईंनी केलेलं पोटच्या मुला सारखा प्रेम आणि त्यांच्या घरातील "ध्यान मंदिरात" माझ्या परीने केलेली थोडीफार साधना तर मी कधीच विसरू शकणार नाही. गुरुवर्य मंडलिक सर, पौर्णिमा ताई आणि नाशिकच्या कार्यकर्त्यांनी दिलेले प्रेम आणि मार्गदर्शन यांनी मला माझ्या पुढील आयुष्यात खूपच उपयोगी पडलं.

नाशिक च्या त्या वास्तव्य नंतर मी इतका नशीबवान कि मला पिंपरी चिंचवड शाखेमाधेही काम करायची संधी मिळाली. निफाडकर सर, जोशी ताई, प्रभुणे काकू यांच्या बरोबर काम करताना फार मजा आली. ऐन कडाकाच्या थंडीत निगडी येथे डिसेंबर मध्ये पार्किंग मध्ये कुडकुडत घेतलेले वर्ग.... वेळात वेळ काढून "जिथे कमी तिथे आम्ही" या नियमाप्रमाणे घेतलेले वर्ग, सहशिक्षक म्हणून शिक्षकांनी केलेलं कौतुक आणि पाठीवरची थाप या मुळे मी येथेही माझ्या परीने शक्य तेवढे काम करू शकलो.

मी अशा फार थोड्या कार्यकर्त्यांपैकी असेन की ज्यांना किव्वा त्यापेक्षा जास्त शाखांमध्ये काम करायची संधी मिळाली असेल. या संमेलना निमित्त हे सारी मंडळी मला कित्ती कित्ती दिवसांनी भेटली काय सांगू !!!

या संस्थेनी आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांनी माझे जीवन जे समृद्ध केले त्या बद्दल मी त्यांचा शतश: आभारी आहे.....