Followers

Tuesday, June 18, 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रुझान:


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रुझान:
16 जून 2019

1. सर्व पक्ष स्वतंत्र
जागा - भाजपा 160 शिवसेना 50 काँग्रेस 20 राष्ट्रवादी 25 मनसे 5 वंचित 10
मुख्यमंत्री: फडणवीस

2. युती आणि आघाडी, बाकी पक्ष स्वतंत्र
जागा - भाजपा 90 सेना 100
काँग्रेस 30 राष्ट्रवादी 40 मनसे 5 वंचित 10
मुख्यमंत्री: ठाकरे

3. युती, काँग्रेस + वंचित, राष्ट्रवादी + मनसे
जागा: भाजपा 65 सेना 75
काँग्रेस 30 वंचित 40, राष्ट्रवादी50
मनसे 20
मुख्यमंत्री: प्रकाश आंबेडकर/ अजित पवार आणि अनेक उप मुख्यमंत्री (निवडणूक निकालानंतर युती सोडून सगळे एकत्र आले तर)

4. भाजपा सेना 80-80 जागा
मुख्यमंत्री पद 2.5 वर्षे अनुक्रमे
ठाकरे आणि फडणवीस

Thursday, June 6, 2019

जागतिक पर्यावरण दिवस ... ५ जून


आज अनेक ठिकाणी world environment day चे batch वाटले जातील.

Environment कशी वाचवायला पाहिये या साठी lectures झोडले जातील.
Earth सेव्ह करण्यासाठी पेल्ज घेतल्या जातील.
काही उत्साही मंडळी गेल्या वर्षीच्या खड्यात नवीन रोप लावून त्याच्या बरोबर सेल्फी काढून फेसबुकवर टाकतील.
आणि आपले यशस्वी राजकारणी 33 कोटी झाडे लावायचा संकल्प आणि आश्वासने देऊन मीडियाचे भरपूर फुटेज खातील...

प्रश्न आहे, जमिनीवर उतरून काम किती जण करणार आहेत? गेल्या 100 वर्षात इतकी बेसुमार वृक्षतोड झाली आहे. झाडं तोडायची आणि लाकूडफाटा विकून पैसे कमवायचे असे अनेक दशके चालू आहे. ज्या जावळीच्या जंगलात एके काळी भर दुपारी सुद्धा सूर्याचे किरण जमिनीपर्यंत पोहोचत नव्हते तिथे आता झाडं संपली. जमिनीची धूप होऊन डोंगर उघडे आणि निरुपयोगी झाले आहेत.
आता या ठिकाणी झाडे लावणे आणि त्याहून अवघड काम म्हणजे ती जगवणे. या साठी सर्वांनी पुढे येऊन कष्ट करायची गरज आहे.


आम्ही काही मंडळी पुण्यातील चतुशृंगी, हनुमान टेकडी, वारजे टेकडी, बाणेर टेकडी आणि वनदेवी इथे झाडं जगवायचा रोज प्रयत्न करत आहोत. अजून खूप काम बाकी आहे...

मंदार कुलकर्णी