Followers

Monday, October 5, 2020

लाल बहादूर शास्त्री - जयंती

हिंदुस्थानचे दुसरे पंतप्रधान, प्रखर नि निष्ठावान देशभक्त लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.. भारताचे पंतप्रधान बनुनही त्यांचे नशीब काही बाबतीत मात्र चांगले नव्हते, त्याची आज जरा आठवण करतो. १. शास्त्री यांना पंतप्रधान देण्यासाठी त्याकाळी प्रचंड विरोध होता. त्यांचे पंतप्रधान पद हे उत्तम कार्य असूनही त्यांना त्याचे खरे यश आणि कौतुक मिळाले नाही. २. पाकिस्तान विरुद्ध मिळवलेला पहिला विजय ही सिद्धा महत्वाची घटना. पण त्यापेक्षा नेहरू यांचे हिंदी चिनी भाई भाई जास्त प्रसिध्द आहे. ३. 'जय जवान जय किसान' ही उत्तम घोषणा त्यांनी दिली पण त्याचे योग्य कौतुक त्याकाळी आणि आजही होत नाही. ४. सरकारी खर्च आणि वैयक्तिक खर्च पूर्णपणे वेगळे दाखवणारे पण या विषयावर फारशी चर्चा कोणी करत नाही. ५. ताशकंद करार पाकिस्तान बराबर केल्याकेल्या त्यांचा विषप्रयोग करून जीव संपवला गेला. त्यांच्या पत्नीने हे अनेक वेळा सांगूनही काही उपयोग झाला नाही. भारतात आली तेव्हा त्यांची विषामुळे काळी निळी बॉडी असूनही त्याचे पुढील शोध कार्य झाले नाही. महात्मा गांधी यांच्या जन्मदिनीच यांचा जन्म हेही त्यांचे दुर्दैव. नेहरू यांचा जन्मदिन बालदिन होतो पण शास्त्री यांचा काहीच नाही. - © मंदार कुलकर्णी २ ऑक्टोबर २०२०