नुकत्याच झालेल्या वसंतोत्सवात या वर्षी प्रथमच मला काम करायची संधी मिळाली आणि दिलेल्या कामा बरोबरच अनेक कलाकार आणि त्यांचे कार्यक्रमही पाहता आले. सगळेच कार्यक्रम चांगले झाले पण त्यात विशेष उल्लेख करायचा झाला तर एकाचा करता येईल तो म्हणजे शेखर सेन यांनी सदर केलेला "कबीर" हा एकपात्री कार्यक्रम.
अगदी खरं सांगायचं तर मी या पूर्वी "शेखर सेन"हे नाव कधीही ऐकले नव्हते. वसंतोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन करताना राहुल देशपांडे ने शेखर सेन यांचा कार्यक्रम ठेऊया असा आग्रह चालवला होता. सुरुवातीला आम्ही देखील थोडे चक्राऊन गेलो होतो पण राहुल ला मनात कुठेतरी प्रचंड विश्वास होता आणि म्हणूनच त्याने हा कार्यक्रम वसंतोत्सवात आयोजायचे ठरवले. मी स्वतः इंटरनेट वरून शेखर सेन यांची थोडीफार माहिती काढायचा प्रयत्न केला.
कार्यक्रमच्या आधी साधारण अर्धा तास या महाशयांनी स्टेजचा ताबा घेतला. त्याच्या सहकाऱ्यांनी स्टेजची व्यवस्था आणि लाईट ची सर्व व्यवस्था पार पडली आणि ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवात झाली. शेखर सेन यांनी कबीर यांच्या वरती २ तासांचा एकपात्री कार्यक्रम करणे का अजबच प्रकार होता.
कबीर स्वतः या भूमीवर येऊन आपले आत्म चरित्र सदर करतात अशी याची थीम आहे. या संपूर्ण एकपात्री कार्यक्रमात शेखर सेन जवळ पास ४० “कबीराचे दोहे” गातात आणि त्यांचे चरित्र पुढे नेतात. "कबीरा, जब हम पैदा हुवे.... जग हसे हम रोये" येथपासून त्यांनी कबीराचे दोहे ज्या ताकदाने गाईले त्याला तोड नाही..... सर्व दुह्यांचे संगीत track वर रेकॉर्ड करून त्यावर शेखर सेन यांनी ही गीते सदर केली आहेत. कबीराच्या जन्मापासून ते त्यांचे पूर्ण चरित्र ओघवत्या वाणीत आणि कबीराच्या दोह्यांची त्याला जोड देत त्यांनी चांगला रंगवला आहे. एकपात्री कार्यक्रम करण्यासाठी आवश्यक असलेली बंदिस्त आणि ताकदवान संहिता, त्याला जोडीला तेवढाच ताकदीचा अभिनय आणि त्यांनी सदर केलेले दोहे ह्या सगळ्याचा जो काही मिलाफ तयार झाले आहे तो काही औरच.....
स्टेजवरती अगदी कमीत कमी नेपथ्य पण त्याचाही मोठ्या चतुराईने वापर केला आहे. वेगवेगळ्या कोनातले lights आणि त्याचा केलेला प्रभावी वापर यामुळे हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवरजातो. कबीराचे संपूर्ण आयुष्य एका एका प्रसंगातून उलगडताना track वर दोहे न चुकता आणि न मागे पुढे होता सदर करणे हि नक्कीच सोपी गोष्ट नव्हे. जुनी कथा आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची दिलेली जोड याचा एक सुंदर संगम म्हणजे शेखर सेन यांनी सदर केलेला "कबीर" ......
http://www.shekharsen.com
This comment has been removed by the author.
ReplyDeleteवसंतोत्सव, हा माझ्यासाठी नेहेमीच एक वेगळा अनुभव ठरला आहे.
ReplyDeleteखंत एकाच वाटते की हे कार्यक्रम, माझ्या कामाच्या स्वरूपामुळे नीट (अखंड/सलग) अनुभवता येत नाहीत.
ह्या लेख द्वारे सदर कार्यक्रमाची छबी माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेली आणि तो रंगमंच तयार करण्यासाठीची धावपळ, कार्यकर्त्यांची मेहेनत, कार्यक्रमाची इतर तयारी, ह्या बद्दल च्या आठवणींना उजाळा मिळाला. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद!
ह्या कार्यक्रमाबद्दल वेगवेगळ्या श्रोत्यांकडून मला संमिश्र प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या. त्यामुळेच कदाचित त्यांचा एखादा प्रयोग तरी पाहण्याची इच्छा बळावली आहे.
प्रत्येक वेळी असे वेगवेगळे कार्यक्रम पुणेकर रसिकांसमोर मांडण्याचा डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचा प्रयत्न आत्तापर्यंत नेहेमीच दिसून आलेला आहे.
२००८ मध्ये गुलाम अली, बेगम अबिदा परवीन, झाकीर हुसैन, यु. श्रीनिवास, शंकर महादेवन आणि शिवामणी सारखे दिग्गज खूप वर्षांनी ऐकायची संधी पुणेकरांना मिळाली.
Click here for Photos
२००९ मध्ये डॉ. एल. सुब्रामाण्याम आणि जर्मन लेईप्झिग फिल्हार्मोनिक वाद्यवृंद, सा रे ग म प च्या "छोट्या स्वर-वीरांचा" स्वर झंकार तसेच "पंचतत्व" आणि उस्ताद रशीद खां - शंकर महादेवन ह्यांच्या जुगलबंदी सारखा उत्कृष्ट स्वरमिलाप.
Click here for Photos
तर ह्या वर्षी, श्री. त्रिलोक गुर्टू आणि त्यांचा वाद्यवृंद, श्री. शेखर सेन ह्यांचा (वर उल्लेखलेला) "कबीर" हा एकपात्री प्रयोग, आणि शर्वरी जमेनीसचा नृत्याविष्कार.
विश्व-संगीत ह्या संकल्पनेवर आधारीत हे सर्व कलाविष्कार रसिकांसमोर मांडण्याचा प्रतिष्ठानचा प्रामाणिक प्रयत्न.
त्यांच्या ह्या संगीत-सेवेत खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल प्रतिष्ठानचे सर्व मान्यवर आणि माझे सह-कार्यकर्ते, ह्यांचा मी आभारी आहे.
धन्यवाद!
Just a gentle reminder, Please don't forget to mention the copyrights of the photograph used. :-)
ReplyDelete