माझ्या डायरीतील एक पान -
आज सकाळी आवरून नेहेमीप्रमाणे बसने ऑफिसला जायला निघालो. सकाळी वातावरण जरा ढगाळच होते. पण पावसाचे काही लक्षण दिसत नव्हते. गेले दोन महिने असेच चालू आहे. जून गेला, आता जुलै सरायची पाळी आली तरी पावसाचा पत्ता नाही. असो. बस नेहेमीप्रमाणे सुसाट वाऱ्याच्या गतीने चालू होती. सहज म्हणून बाहेर पाहिले तर डावीकडे ढगांच्या आडून सूर्य जरासं दर्शन देत होता. काही अंतरानंतर एक पावसाची छोटीसी सर शिडकावा करून गेली. सकाळच्या वेळचे गार वातावरण अजून थोडेसे गार झाले. इतक्यात उजव्या बाजूला एक छान सुर्यधनुष्य पाहायला मिळाले. अगदी सुस्पष्ट. साधारण १८० अंशात त्याचे मनोहारी सप्तरंग दिसत होते. मी खिडकीत बसलेलो असल्याने मला ते पूर्ण पाहायला मिळत होते. जणू मी निसर्गाचा एक छान canvas पाहत होतो. मन परत एकदा माझ्या लहानपणात घेऊन गेलं. बालपणी असंच इंद्रधनुष्य पळस्पे येथे अनेक वेळा पाहिल्याचं लख्ख आठवतंय. गम्मत म्हणजे बसबरोबर ते इंद्रधनुष्यही मला साथ करत होतं. जसा चंद्र प्रवासात आपली साथ करतो अगदी तस्सं. एकदा वाटलं फोटो काढावा पण म्हटलं काही गोष्टी फोटोपेक्षा मनात capture केलेल्याच किती छान वाटतात.
असे काही मिनिटे मनोरंजन झाले आणि पुढच्या वळणावर ते इंद्रधनुष्य अंतर्धान पावले. स्वप्नांच्या नगरीतून पुन्हा खऱ्या practical जगात आल्यासारखे वाटले. थोडे वाईट वाटले…. बाकी सारे धावते जग मोबाईल वर गुड मोर्निंग चे मेसेज पाठवण्यात गर्क होते आणि मी निसर्गाच्या या चमत्कृतीचा आनंद घेत पुढील प्रवास करू लागलो.
- मंदार कुलकर्णी
31 Jul 2014

No comments:
Post a Comment