आज सहज विचार करत बसलो होतो. बऱ्याच वेळेला असं वाटते की इतिहासाची पाने परत एकदा मागे फिरवून पाहता आली तर? त्याही पेक्षा परत इतिहासात जाता आला तर कसं वाटेल…. सध्याच्या काही घटनांवरून त्याचा प्रत्यय आला.
Office मध्ये दशकभरापूर्वी मंडळी ज्या साहेबाला report करायची तसंच आता काही जणांसाठी झालं आहे. रवि शास्त्री परत एकदा भारताच्या क्रिकेट टीम चा Manager झाला आहे. जसा १९९७-९८ मध्ये भा ज पा सत्तेवर आला आणि काँग्रेस विरोधी पक्षात बसत होते तसंच काहीसं परत झालं आहे. माधुरी दिक्षीत परत एकदा वेगळ्या मध्यमाद्वारे का असेना प्रेक्षकांसमोर आली आहे. तुम्हाला आठवतं का …. जेव्हा सर्वात आधी मोबाईल भारतात आले तेव्हा बिर्ला ए टी & टी ने सुंदर जाहिरात केली होती. एक जण दुसऱ्याला सांगत असतो…. "मला सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत या क्रमांकावर फोन करा. ११ ते ५ या क्रमांकावर आणि नंतर घरी या क्रमांकावर…" तर बिर्ला ए टी & टी चा म्हणतो, "मला कधीही मोबाईल वर या क्रमांकावर फोन करा…" नुकताच माझ्या एका मित्राने असाच मेसेज पाठवला… "मी टूर वर असून मला अमेरिकेमध्ये या तारखांमध्ये या क्रमांकावर, यु के मध्ये या तारखांमध्ये या क्रमांकावर आणि नंतर चीन मध्ये या तारखांमध्ये या क्रमांकावर संपर्क साधा… !!!"
एकेकाळी जेव्हा दूरचित्रवाणी नव्हतं तेव्हा आकाशवाणी हे एकंच माध्यम होतं आज दूरचित्रवाणी असूनही बहुतेक मंडळी FM आकाशवाणीच ऐकतात. पूर्वी अनेकांनी पितळेची भांडी वापरलेली असतील. मधल्या काळात स्टेनलेस स्टील ने पितळेला हद्दपार केलं पण आज लोकं कॉपर बॉटम ची भांडी परत वापरू लागले आहेत. पितळेचे बंब अनेकांची दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत.
कालाय तस्मै नम: …. हेच खरं…
- मंदार कुलकर्णी
२३ ऑगस्ट २०१४
No comments:
Post a Comment