बाजीराव मस्तानी (चित्रपट)
18 डिसेंबरला बाजीराव
मस्तानी हा चित्रपट रिलीज झाला. त्याच्या आधीपासून त्याच्या बद्दल आलेल्या कहाण्या,
‘पिंगा’ आणि ‘वाट लावली’ अशी गाणी ऐकून तर तो पाहायची इच्छा होत नव्हती.
शेवटी 2 महिन्यांनी एक रसिक म्हणून (इतिहास विषयाची आवड आणि अभ्यास बाजूला ठेवून)
मी तो पाहिला आणि खरे सांगतो, डोके उठले आणि डोके दुखायला लागले.
निनाद बेडेकर सारख्या
इतिहास तज्ञाचे नाव पुढे करून संजय लीला भन्साळी इतिहासाची इतकी मोडतोड करतील असे
वाटले नव्हते. निनाद बेडेकर जर आज जीवंत असते तर मी तडक त्यांच्या घरी जाऊन
विचारणा केली असती. मुळात संजय लीला भन्साळीना बाजीराव पेशवे समजलाच नाहीये. एखादी
ऐतिहासिक कलाकृती बनवताना जी काळजी घ्यायला पाहिजे ते दिसत नाही. उदा.
1.
पेशवे
हे भारतभर पसरलेल्या ‘मराठा साम्राज्य’ चालवणारे मोठे प्रस्थ
होते. शाहू केवळ नामधारी होते. त्यामुळे हा चित्रपट बनवताना एक साम्राज्याचे पंतप्रधान/राजे
असेच दाखवणे आवश्यक होते
2.
बाजीरावाने
बायकोला काशी/काशीबाई हाक मारणे
3.
केशवपन
केलेल्या राधाबाई ने घरात मोकळे डोके दाखवणे
4.
बाजीराव
आणि काशीबाई चा so called टब बाथ
5.
बाजीरावाच्या
तोंडी असलेले ‘वाट लावली’ गाणे
6.
काशीबाई
आणि मस्तानी यांचे ‘पिंगा’ गाणे
7.
इतिहासाप्रमाणे
मस्तानी तिच्या महालात नजरबंद होती, साखळ दंडाने कधीच बंदिस्त नव्हती.
8.
आणि
असंख्य ....
बाजीराव आणि मस्तानीचे
लग्न झाले होते आणि ती त्याच्या बरोबर बुंदेल खंडाहून वाजत गाजत आली होती. इथे
मात्र भलतेच दाखवले आहे.
एक राज घराण्यातील संघर्ष
कसा दाखवावा याचेही भान या चित्रपटाने पुर्णपणे सोडले. एक प्रेमकथा दाखवताना
चिमाजी आप्पा, राधाबाई आणि
नानासाहेब पेशवे यांना पार खलनायक केले आहे. राज घराण्यातील संघर्ष इतक्या उथळपणे
आणि तद्दन मसाला हिन्दी चित्रपटाप्रमाणे दाखवला आहे....
पूर्वीच्या काळी ही असे
चित्रपट आले. उदा. मुगले आझम पण त्याची नखाची ही सर या चित्रपटाला नाही. अनेक जण
या चित्रपटाची मुगले आझमशी तुलना करतात. पण सलीम अनारकलीच्या हळुवार प्रेमाची इथे
कुठेच जवळीक नाही. एक चुकीची प्रेम कहाणी दाखवताना इतिहासाची यांनी पार “वाट लावली”.
मला इथे एकच प्रश्न
विचारावासा वाटतो. हाच चित्रपट जर इंग्लंडची राणी एलिझाबेद/ लेडी डायना,
छत्रपती शिवाजी, मुगल सम्राट औरंगजेब किंवा आजच्या काळातील ‘बिल
क्लिंटन’ किंवा बराक ओबामा यांच्यावर ऐतिहासिक कलाकृती म्हणून बनवला
असता आणि cinematic liberty ची ढाल घेऊन असे अर्वाच्च प्रकार घुसवले असते तर
प्रेक्षकांना चालले असते का? त्यांच्या अंत:पुरातील गोष्टी अशा उथळ पणाने
दाखवून चालले असते का?
Cinematic liberty घेताना किती घ्यायची याचे ही काही ताळतंत्र हवे.
आज राज घराण्यातील स्त्रिया त्याही राणी पदावरील काशीबाई अशा नाचतील का?
बाजीराव स्वत: असे नाचेल का? याचे साधे भान ही असू नये?
काही जण म्हणतात,
इतका भव्य चित्रपट बनवला, त्याने 350 कोटी रुपये कमावले,
पण त्यात भव्य काहीच दिसले नाही. केवळ संगणकावर बनवलेल्या लढाया आणि बाजीरावाने
केलेले बच्चन सारखे काही स्टंट. यात कसली आली आहे भव्यता?
ना हा चित्रपट बाजीरावाची यशोगाथा सांगत ना प्रेमकहाणी नीट दर्शवत. मस्तानी
बाजीरावाला भेटण्यापूर्वी एक हुशार, लढाऊ राजकन्या होती. तीच नंतर अतिशय अगतिक,
हताश, गळीतगात्र आणि नाच करणारी अशी का दाखवली आहे?
चित्रपटात बाजीराव बहुतेक काळ आपल्या सिक्सपॅकचे प्रदर्शन करत फिरत असतो किवा
काशीबाई किंवा मस्तानी बरोबर प्रेमाचे चाळे. यात राजेपण कुठेच नाही. ज्या
बाजीरावाने मराठा साम्राज्य महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन दिल्ली पर्यन्त गवसणी
घातली, ज्याच्या मुलाने (रघुनाथ) आजच्या अफगाणिस्थान मधील ‘अटक’
येथील किल्ला सर करून मराठा साम्राज्य विस्तारले, त्या बाजीरावाला मस्तानी
च्या प्रेमातील ‘देवदास’ बनवला आहे. बाजीरावाचा मृत्यू अतिश्रमाने,
ताप आणि उष्मा घाताने झाला आणि चित्रपटात तर भलतेच.
ह्या सिनेमाविषयी मत
प्रदर्शन केवळ सिनेरसिक किंवा पेपर मधील परीक्षण करताना जाणवते की,
एका मराठी साम्राज्याच्या अत्यंत यशस्वी राजाची ‘यशोगाथा’
करायची सोडून मस्तानी सारख्या नाचणार्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या वेड्याची
गोष्ट अशी तद्दन फिल्मीकहाणी केली आहे. तिथेच हा चित्रपट प्रेक्षकांची शुद्ध
फसवणूक करतो. उभ्या उण्यापुर्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत एकही लढाई न हरणारा हा ‘जगातील
एकमेव राजा’ असताना त्याच्या विषयी असा चित्रपट काढणे हे
भारतीय चित्रपट सृष्टीचे दुर्दैव आहे....
- - मंदार कुलकर्णी
21
फेब्रु 2016
No comments:
Post a Comment