Followers

Thursday, July 26, 2018

70 वर्षांचा नाचणारा नागोबा

70 वर्षांचा नाचणारा नागोबा

नेहरू गांधी घराण्याचा पगडा फक्त भारतात नव्हे तर भारताबाहेर सुद्धा आहे. वृद्ध मंडळी आजही इंडिया म्हटले की नेहरू, दिल्ली असे शब्द उच्चारतात. आपलंही इतर छोट्या देशांच्या बाबतीत थोडेफार असेच होते म्हणा...😀

मुद्दा तो नाहीये. नेहरूंनी परदेशी पाहुण्यांना भारतीय संस्कृती काय दाखवली तर "पुंगी वाजवणारा गारुडी" आणि त्याच्यावर सो कॉल्ड नाचणारा नागोबा. आज 70 वर्षानंतर ही पॅरिस च्या डिजनेवल्ड मधील स्मॉल वल्ड च्या राईड मध्ये भारत दर्शवताना ताजमहाल बरोबर पुन्हा दिसला तो एकदा *पुंगी वाजवणारा गारुडी आणि त्याच्यावर सो कॉल्ड नाचणारा नागोबा पहायला मिळाला. 😡😡

आज जगात करोडो अनिवासी भारतीय आहेत, लाखो पर्यटक डिजनेवल्डला दरवर्षी भेट देत असतात. आजपर्यंत कोणालाच यात काही वावगं दिसलं नाही? कोणालाच या बद्दल डिजनेवल्ड कडे तक्रार करावीशी वाटली नाही आणि ते काढावेसे वाटले नाही? आपण आपल्या देशाची 2018 मध्ये काय प्रतिमा सादर करीत आहोत याचा सर्वांनी विचार करायला हवा...

मंदार कुलकर्णी
18 मे 2018

No comments:

Post a Comment