मी काही कधी त्यांना प्रत्यक्ष भेटलो नाही की कधी त्यांचा गाण्याचा कार्यक्रम कधी पाहिला. पण माझ्या कॉलेज जीवनात आनंद भरण्यात त्यांची मोठी भर आहे हे मी इथे नोंदणी करतो. त्यांनी गीते गायलेले चित्रपट एकदम डोळ्यासमोर आले. 'मैने प्यार किया' , 'साजन', 'हम आपले हे कौन' हे चित्रपट त्याकाळी प्रसिद्ध होण्यात कलाकार यांच्या बरोबर एस पी यांचा मोठा वाटा होता. सलमान ला खरा हिरो बनवण्यात बनवण्यात सिंहाचा वाटा फक्त आणि फक्त एस पी यांचाच होता.
माझ्या बाबतीत म्हणाल तर मी त्यांची गाणी ऐकत ऐकत आणि म्हणत म्हणत आमचे कॉलेज जीवन पुढे गेले. तसेच दक्षिणेतील अनेक चित्रपट हिंदी मध्ये आल्यावर खरंच या गायकाचा ग्रेट नेस जगाला कळला जसे 'अप्पू राजा' पासून 'रोजा' पर्यंत चित्रपट अनेक वेळा तेव्हा पाहिले शिवाय त्यांच्या गाणाच्या कॅसेट घेऊन नंतर संगीताचा आनंद मी अनुभवला.
एस पी चे दक्षिणेकडे असलेले संगीतातील वजन मी त्या काळात सोलापूरला असल्याने मला चांगलेच माहीत होते. त्यांच्या दक्षिणेकडे असलेल्या चित्रपट यांची गीते ही मला ऐकायला मिळाली. तेलगू जन्मभाषा असून त्यांनी अनेक भाषांत गीत गायन केले. हिंदीत 'एक दुजे के लिये' पासून 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपट पर्यंत त्यांनी उत्तम हिंदी चित्रपटात गायन केले आणि आपल्याला त्यांनी आनंद दिला. हिंदी मध्ये इतक्या उत्तम पध्दतीने गायक करून त्यांचे कौतुक कमी झाले असेच वाटते.
आज त्यांच्या बातमीने जवळजवळ 25 - 30 वर्षाचा इतिहास नजरेसमोर आला आणि माझा आवंढा अडकला. इंटरनेट वर त्यांनी गायलेली गीते बराच वेळ ऐकत बसलो पण मन शांतच डोईना. माझ्या जुन्या आठवणी एकामागोमाग एक डोळ्यासमोर येऊ लागल्या....
माझी या छोट्या लिखानाद्वारे त्यांना श्रद्धांजली. 🙏🏻🙏🏻
- © मंदार कुलकर्णी
25 सप्टेंबर 2020

No comments:
Post a Comment