Followers

Tuesday, September 5, 2017

प्राजक्त

प्राजक्त

आला आषाढ श्रावण, फुले प्राजक्त दारी ।
येई पावसाची सर, नेई सुगंध दारोदारी ।।

प्राजक्त फुले रातीला, फुले सांडती भोर ।
घेता फुल हातामध्ये, जाते कोमेजू सत्वर ।।

अति नाजूक ही फुले, फांदीवरी तोडू नये ।
सांडी फुले अंगणी, वेचू अलगद त्वये ।।

मिळे प्राजक्त समुद्रमंथनी, नेई इंद्र तिये स्वर्गी ।
हट्ट सत्यभामा करी, श्याम युद्ध करी स्वर्गी ।।

त्याने आणला प्राजक्त, लावे सत्यभामे द्वारी ।
फुले पडती त्याची, रुख्मिणीच्या पदरी ।।

कुणी म्हणे हरसिंगार, कुणी म्हणे शेफाली ।
मंद सुगंध फुलांचा, नेई आठवण भूतकाली ।।

- मंदार कुलकर्णी
3 सप्टेंबर 2017
 

1 comment: