Followers

Sunday, October 8, 2017

मराठी विकिपीडियाची दशा













आजच्या पेपर मध्ये मराठी विकिपीडियाची दशा झाल्याची बातमी वाचली आणि मला जुने दिवस आठवले. 2009 मध्ये मी मराठी विकिपीडिया वर काम करायला सुरुवात केली आणि अपार कष्ट करून त्याची गाडी आम्ही काही लोकांनी नुसती रुळावरच आणली नाही तर जोरात पळायलाही लागली. 2011 च्या जागतिक विकिपीडिया संमेलनात मराठी चा झेंडा अभिमानाने आम्ही मिरवला. लेखांची संख्या अतिशय जोरात पुढे नेली आणि त्यातले कंटेंट ही मजबूत वाढवले. मधल्या काळात अनेक मंडळींच्या शुभेच्छानी मी मराठी विकिपीडियावर admin अर्थात प्रचालक झालो. आणि थोड्याच दिवसात ग्रह फिरावेत तसे झाले. अत्यंत हीन दर्जाचे राजकारण काही मंडळीकडून सुरू झाले. मराठी विकिपीडियावर नवीन नवीन प्रॉक्सी खाती तयार करून शिवीगाळ करणे, मानहानी कारक मजकूर मुद्दामून परत परत टाकणे हे प्रकार खूप प्रमाणात वाढले. शेवटी मी सप्टेंबर 2013 मध्ये सर्व पदांचा राजीनामा दिला. माझ्या सारखे अजून काहीजण या बीभत्स राजकारणाला बळी पडले आणि मराठी विकिपीडियावर काम जवळ जवळ थांबले. मराठी विकिपीडियाचा अजून एक प्रकल्प मराठी विकिस्रोत ची पण हीच गत झाली आहे. गेल्या 4 वर्षात जी काय दुरवस्था झाली आहे ती तुम्ही पाहू शकता. वाईट याचेच वाटते की हीच राजकारण करणारी मंडळी गेली 4 वर्षे जागा अडवून बसले आहेत. आज वर्तमानपत्रातून याची दशा पत्रकारांनी सर्वांच्या नजरेस आणून दिली त्या बद्दल त्याचे अभिनंदन.
एवढेच सांगतो, जोवर राजकारण आणि पाय ओढायची प्रवृत्ती येथून जात नाहीत तोवर मराठी विकिपीडियाचे काहीही भले होऊ शकत नाही.
मंदार कुलकर्णी

Tuesday, October 3, 2017

मुंबई

 
जो तो येतोय मुंबईमध्ये म्हणतो येथेच पोटाची खळगी भरणार ।
मुंबईत झालीय अपार गर्दी त्याला कोण काय करणार .... ।। धृ ।।
 
एकेकाळी ७ बेटांचा समूह इंग्रजांनी जोडला
रस्ते आले ट्रेन आली वाहतुकीची साधने आली
पण या रस्त्यावरून अजून किती लोक जाणार ... ।। १ ।।
 
मुंबईचे गिरणगाव झाले कोकणातून माणसे आली
देशावरची माणसेही नशीब अजमावयला इथेच आली
रेल्वे रूळ १५० वर्ष तेवढेच राहिले त्याला कोण काय करणार... ।। २ ।।
 
स्वातंत्र्यानंतर मुंबई आर्थिक राजधानी झाली,
मोठे कारखाने कंपन्या आल्या, देशा परदेशातून ज्ञान आले
लोकवस्ती आता वसई विरार पुढे गेली त्याला काय करणार ... ।। ३ ।।
 
सगळ्यांना मुंबई हवी, पोसायला आणि कमवायला
इज्जत हवी, पैसा हवा, शान आणि मान हवा
अहो, अंबानीनाही २७ मजली 'अँटीलिया' बांधायला हीच मुंबई मिळणार ... ।। ४ ।।
 
किडा मुंगी सारखे मरतायत माणसे रोज किंमत नाही राहिली
फुटपाथची पागडी आता लाख आणि कोटीत गेली
बॉंबस्फोट होऊनही पोटासाठी त्यांना लगेच बाहेर पडावे लागणार ... ।। ५ ।।
 
'मन्नत' असो वा 'जन्नत' प्रत्येकाला मुंबईत घर हवे आहे
सरकार ही दर ५ वर्षांनी झोपड्या नियमित करायला बसलेच आहे
मुंबईचा श्वास गुदमरलाय त्याला कोण मोकळे करणार ... ।। ६ ।।
 
- मंदार कुलकर्णी
दसरा २०१७
30 sep

लाल बहादूर शास्त्री












सत्ययुगातील माणूस कलियुगात जन्माला आला
 
अपघातापायी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा देऊन बसला
 
केली पाकिस्थानने ताशकंद करारात एक मोठी खेळी
 
विषाच्या प्याल्याने आपले पंतप्रधान गेले अवकाळी...
 
- मंदार कुलकर्णी
2 Oct. 2017