Followers

Sunday, October 8, 2017

मराठी विकिपीडियाची दशा













आजच्या पेपर मध्ये मराठी विकिपीडियाची दशा झाल्याची बातमी वाचली आणि मला जुने दिवस आठवले. 2009 मध्ये मी मराठी विकिपीडिया वर काम करायला सुरुवात केली आणि अपार कष्ट करून त्याची गाडी आम्ही काही लोकांनी नुसती रुळावरच आणली नाही तर जोरात पळायलाही लागली. 2011 च्या जागतिक विकिपीडिया संमेलनात मराठी चा झेंडा अभिमानाने आम्ही मिरवला. लेखांची संख्या अतिशय जोरात पुढे नेली आणि त्यातले कंटेंट ही मजबूत वाढवले. मधल्या काळात अनेक मंडळींच्या शुभेच्छानी मी मराठी विकिपीडियावर admin अर्थात प्रचालक झालो. आणि थोड्याच दिवसात ग्रह फिरावेत तसे झाले. अत्यंत हीन दर्जाचे राजकारण काही मंडळीकडून सुरू झाले. मराठी विकिपीडियावर नवीन नवीन प्रॉक्सी खाती तयार करून शिवीगाळ करणे, मानहानी कारक मजकूर मुद्दामून परत परत टाकणे हे प्रकार खूप प्रमाणात वाढले. शेवटी मी सप्टेंबर 2013 मध्ये सर्व पदांचा राजीनामा दिला. माझ्या सारखे अजून काहीजण या बीभत्स राजकारणाला बळी पडले आणि मराठी विकिपीडियावर काम जवळ जवळ थांबले. मराठी विकिपीडियाचा अजून एक प्रकल्प मराठी विकिस्रोत ची पण हीच गत झाली आहे. गेल्या 4 वर्षात जी काय दुरवस्था झाली आहे ती तुम्ही पाहू शकता. वाईट याचेच वाटते की हीच राजकारण करणारी मंडळी गेली 4 वर्षे जागा अडवून बसले आहेत. आज वर्तमानपत्रातून याची दशा पत्रकारांनी सर्वांच्या नजरेस आणून दिली त्या बद्दल त्याचे अभिनंदन.
एवढेच सांगतो, जोवर राजकारण आणि पाय ओढायची प्रवृत्ती येथून जात नाहीत तोवर मराठी विकिपीडियाचे काहीही भले होऊ शकत नाही.
मंदार कुलकर्णी

No comments:

Post a Comment