Followers

Sunday, March 4, 2018

सत्यघटने वरील मुक्तकाव्य

सत्यघटने वरील मुक्तकाव्य



काल माझ्या शाळेतील वर्ग मैत्रिणीने तिच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाचे फोटो पाठवले आणि छातीत चर्र झालं
सुरुवातीला विश्वासच बसेना, वाटलं गम्मत करत असेल, कदाचित आई वडिलांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाचे असतील, पण नाही हो..

अजून एक मनात विचार आला, 'बालविवाह' तर नसेल ना? 😊
चाळीशी पार केली आहे सर्वांनी पण म्हणून लग्नाच्या 25व्या वाढदिवसाचे फोटो टाकायचे?

एकदम डोक्यावरचे 2500 केस पांढरे झाले असे वाटून गेले. पटकन आरशात पाहिले,
वाटलं, इतके काही वय वाढलं नाहीये...
केसांना कलप लावायचं हे वय नाहीये
न राहवून मित्राला फोन केला. जीवाची घालमेल व्यक्त केली, बरं वाटलं...

मनात म्हटलं, वय हे मानण्यावर असतं,
मन तरुण असेल तर जग सगळं तरुण वाटतं
आजचं वय फक्त एक आकडा आहे
दिलखुलास मन असणं हीच तर आजची गरज आहे...

©मंदार कुलकर्णी
4 मार्च 2018

__________________________________________________________________

भरकटलेे मन
.फोटो बघून छान..
२५वर्षाचा लगनदिनी...वर्गमैत्रीणीच्या..

वाटले असावी गंमत..
मनाला नाही पटत..
असतील मायबाप फोटोत.
.वर्गमैत्रीणीच्या..

मन करी विचार..
हा असेल "बालविवाह"जर...
कोण जाणे,खोटं की खरं..
मनी काय रे ...वर्गमैत्रीणीच्या..

झाली म्हणून चाळीशी..
थट्टा का हो अशी..
फोटो टाकून का फसवीशी..
मनी काय त्या ..
वर्गमैत्रीणीच्या...

वाटले,असंख्य.केस पांढरेझाले..
आता मग आरश्यात पाहणे आले..
म्हणून फोन करून मित्र जवळ केले..
का यावे कोपऱ्यात मनाच्या...

धीर मिळे,मित्रांकडून..
विचार आला हो, तो आतून..
वय आकड्यांचे तारुण्यातून..
दिलखुलास जगावे..मनातून..

हेच सांगणे,विचारातून..
मंदार"दिसतो लेखातून..
गुंफले रे शब्दातून..
"शब्दप्रभू"कृपा..प्रतिभेच्या..


शब्दप्रभू....अनिलकाका

No comments:

Post a Comment