Followers

Sunday, August 26, 2018

Kaliyug

There are four yugas widely accepted in Hinduism. They are :
1. Satya yug
2. Treta yug (Ramayana)
3. Dwapara yug(Mahabharata)
4. Kal yug(Present)

In Satya yug, the fight was between two worlds (Devalok & Asuralok). Asuralok being the evil, was a different WORLD.

In Treta yug, the fight was between Rama and Ravana. Both rulers from two different REGION OR COUNTRIES.

In Dwapara yug, the fight was between Pandavas and Kauravas. Means it was in the same REGION rather it was from the same VANSH, same FAMILY.

Kindly note how the evil is getting closer. For example, from a DIFFERENT WORLD to a DIFFERENT COUNTRY to the SAME FAMILY.

Now, know where is the evil in Kaliyug???

It is within our close family, that could be our brother, sister, parents, son or daughter. There would difference of opinion between them and may fight among themselves. What we need to learn from this?

We need really make sure that we work with honesty and truthfulness even though we need to fight with them. The only person would win who would continue to demonstrate the values even in the recent times...

We have to retrospect ourselves, understand what is right for both for oneself and other and take the right decisions. The evil has already arrived inside our house but we need to service with these values...

- Mandar Kulkarni



Wednesday, August 22, 2018

युगांत - अटलजी

युगांत

कालपासून टीव्ही आणि इंटरनेट वर आणि आज पेपरात अटलजींच्या बद्दल इतके काही चांगले लिहून आले की मी पामर त्यात काय भर घालणार? 

अटलजी यांनी ज्या पद्धतींचे संघटनेचे कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जन संघ आणि भा ज पा असे चौफेर कार्य केले ते खरेच अनुकरणीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अडवाणी पासून प्रमोद महाजन, मोदी यांच्यापर्यंत किती जणांनी काम केले. 

पंतप्रधान पद मिळूनही हा मनुष्य काही बाबतीत कमनशिबीच राहिला. संसदेत इतके वर्ष राजकारणात राहूनही प्रत्यक्ष राज्य करायची संधी त्यांना कमीच मिळाली. 23 पक्षांचे कडबोळे असलेले सरकार त्यांना चालवावे लागले. अगदी छोट्या छोट्या पक्षांनी ही लायकी नसताना त्यांच्यावर गुरगुरण्याचा कायम प्रयत्न केला मग तो शिवसेना असुदे किंवा जय ललिता. 

213 जागा मिळवूनही NDA सोडून बाकीच्या पक्षांनी मदत न केल्याने बिचाऱ्यांना 13 दिवसात सत्ता बहुमत मिळवता या आल्याने सत्ता सोडावी लागली. त्यांच्या दुर्दैवाची परिसीमा म्हणजे केवळ एक मताने पडलेले त्यांचे सरकार. अखिल जगात लोकशाही नांदणाऱ्या सर्व देशांमध्येही कधीही एका मताने विश्वास दर्शक ठराव ठरल्याचे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. आधी शब्द देऊनही काही पक्षांनी आयत्या वेळी गद्दारी केली आणि अटलजींना 17 नोव्हे 1999 रोजी केवळ 13 महिन्यात राजीनामा द्यावा लागला. 1999 ते 2004 उत्तम काम करूनही पुढच्या निवडणुकीत देशाने त्यांना नाकारले आणि त्यांची कारकिर्दच संपली आणि ते विजनवासात गेले. 

2015 साली भा ज पा सरकारने त्यांना भारतरत्न दिले पण तेव्हा विस्मृतीच्या विकाराने ते ग्रस्त होते. काय म्हणावं या नशिबाला... 93 वर्षे आयुष्य लाभलेल्या या भीष्माचार्यांना खऱ्या भीष्माचार्यांसारखेच कमनशिबी ठेवले. राजा असूनही राज्य नाही. सत्ता असूनही सत्तेत नाही. कवी मनाच्या या हळव्या माणसाला त्यांच्या शेवटच्या काळात भावना आणि जाणिवा कळू नयेत या पेक्षा दुर्दैव ते काय?

ज्या मूकपणे पोखरण अणूचाचणीचा निर्णय त्यांनी दिला त्याच मूकपणे त्यांनी जगाचाही निरोप घेतला. ज्या पक्षाच्या स्थापनेपासून कष्ट उपसले, तो पक्ष आज अख्या देशात एकहाती आणि 20 राज्यात सत्ताधारी आहे हे त्यांच्या मेंदूपर्यत पोहचूच शकले नाही. त्यांच्या पायाशी ही बसायची लायकी नेसलेल्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर वेळोवेळी भरपूर तोंडसुख घेतले, त्यांच्यावर बेदरकार आरोप केले. पत्रकारितेनेही त्यांनी इंदिरा गांधींना कधीही 'दुर्गा' म्हटलेले नसताना अकारण त्यांच्या तोंडी ते शब्द घालून इंदिरा गांधींना उगीचंच आभाळापेक्षा मोठे बनवले. 

अटलजींपेक्षा वय आणि मानाने लहान असलेली दुसऱ्या पक्षातली अनेक मंडळी राजकारणात खूप पुढे निघून गेली आणि अटलजी मात्र आपले संस्कार, आपली तत्वे उराशी कवटाळून शेवट पर्यंत वाटचाल करीत राहिले. 

असा हा इतिहासपुरुष आज आपल्याला कायमचा सोडून गेला. एका युगाचा अंत झाला, युगांत झाला.

- मंदार कुलकर्णी
17 ऑगस्ट 2018

Thursday, August 16, 2018

राष्ट्रगीत आणि डोक्यात आलेले अश्रू...

राष्ट्रगीत आणि डोक्यात आलेले अश्रू...


आज सकाळी मोदींनी केलेलं भाषण गाजलं त्याबरोबर याचीही चर्चा झाली की राष्ट्रगीत चालू असताना त्यांच्या डोक्यात आलेले अश्रू...

मोदी भावनिक होतात आणि विशेषतः संसद, देश, राष्ट्रध्वज यांच्या बाबतीत जरा जास्तच. पण डोक्यात विचार सारखा येतोय की आज राष्ट्रीय गान चालू असताना त्यांच्या मनात काय असेल? खरं तर आजचे हे त्यांचे पाचवे ध्वजारोहण. आजच्या आणि पुढच्या 15 ऑगस्ट मध्ये एक सगळ्यात मोठा टप्पा आहे आणि तो म्हणजे 2019 मधील लोकसभा निवडणुका. 2013 मध्ये मोदी होते पंतप्रधान पदाचे उमेदवार तर आता आहेत खुद्द पंतप्रधान. न जाणो लोकसभा निवडणुकीत पुरेशा जागा नाही मिळाल्या तर पुढच्या 15 ऑगस्टला त्यांना परत झेंडा वंदन लाल किल्ल्यावरून करता येईल? 

त्यांनी जे आधुनिक भारताचे स्वप्न सत्यात आणायची आणि ते सांगायची संधी परत त्यांना मिळेल का? आज मोदी सरकार इतक्या विविध अंगांनी प्रचंड काम करत आहे. मला असं वाटतं त्यांना अजून 5 वर्षे द्यायलाच हवीत. नाही का?
- मंदार कुलकर्णी

हिंदुस्थान इतिहास


हिंदुस्थान इतिहास

बलुचिस्तान ला स्वातंत्र्य मिळाले 11 ऑगस्ट 1947 रोजी. पाकिस्तान ला मिळाले 14 ऑगस्ट आणि हिंदुस्थान ला मिळाले 15 ऑगस्ट. पण आपल्याला इतिहासात ह्या नोंदी शिकवल्याच गेल्या नाहीत. सुरुवातीपासूनच बलुचिस्तान ने स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला होता आणि विशेष म्हणजे त्यांचा दुसरा पर्याय भारत होता. 1948 मध्ये पाकिस्तान ने बळजबरीने बलुचिस्तान काबीज केला आणि आणि केवळ 7 महिने बलुचिस्तान ला स्वातंत्र्य मिळाले. पुढे पाकिस्तान दडपशाही आणि सैन्यदलाच्या वर्चस्वामुळे बलुचिस्तान चा आवाज दाबला गेला तो कायमचा. या पुढे जाऊन बलुचिस्तान भारताशी संलग्न झाला असता तर इराण आणि अफगाणिस्तानशी सीमा लागल्याने आपल्याला अजून शत्रू मिळाले असते असते असा पद्धतशीर कांगावा काँग्रेस ने केला. स्वातंत्र्यापेक्षा पंतप्रधान पदाची अतीव घाई झालेल्या नेहरूंकडून या पेक्षा वेगळे काय सांगितले जाणार?
- मंदार कुलकर्णी

Sunday, August 5, 2018

शंख फुंके


शंख फुंके

पुण्यात आजकाल कशाचे कलासेस निघतील किंवा कोणावर कशाचे भूत सवार होईल हे सांगणे कठीण आहे. गेल्या महिन्यापासून आमच्या परिसरात शंख वादनाचे वर्ग सुरू झाले आहेत. सुरुवातीला फारसे जाणवले नाही पण आता "जमायला लागल्यापासून" भरपूर शंखाचे आवाज घर बसल्या ऐकायला यायला लागले आहेत. माझा या वर्गांना आणि शंख वादनाला पूर्ण पाठिंबा आहे. संध्याकाळच्या असह्य ढोल वादनांपेक्षा हे फार सुसह्य आहेत पण इथे मुद्दा आहे की हे किती दिवस ऐकावे लागणार? बरं, हे क्लास शनिवारी आणि रविवारी सकाळी असतात. साधारणपणे आमच्यासारखी आठवडाभर कामाला जुंपलेली मंडळी वीकएंड ला जरा उशिरा उठतो (माझ्या मते यात गैर काही नाही). पण या शंख वादनाने पहाटे पासूनच झोपमोड होते. मनात विचार येतो, मुसलमान मंडळींनी पहाटे दिलेली बांग आणि हे आवाज याची वेळ एकच, त्रासही एकच. त्यांना आपण विरोध करतो, मग याचे काय? या बाबत याचे वर्ग आयोजक आणि त्यांचे उत्साही विद्यार्थी काही विचार करतील काय?

- मंदार कुलकर्णी