Followers

Monday, October 1, 2018

पराक्रम एका गणेशोत्सव मंडळाची कहाणी



पराक्रम

आज एका गणेशोत्सव मंडळाची कहाणी सांगणार आहे. अभिनव शाळेकडून सावरकर पूल अर्थात पौड फाट्याकडे जाताना जो एक मार्ग (मराठीत वन वे) आहे त्या रस्त्यावर अष्टविनायक मित्र मंडळ नावाचे सार्वजनिक मंडळ आहे. काल रात्री त्या मंडळाच्या गणपती स्थापनेसाठी त्यांनी एक पथक ठरवले होते. त्या पथकाचा ट्रक भर गर्दीच्या वेळी रात्री आठ वाजता वन वे मध्ये अर्थातच विरुद्ध दिशेने घुसला. सिग्नल ला अनेक वाहने थांबली असल्याने त्याला पुढे जाता येत नव्हते. त्याचा वेग आणि आणि आवेश पाहता तो 2-4 जणांना उडवून पुढे जाण्याच्या बेतात होता. पुढे जाता येईना तेव्हा ट्रक मधील वाजवणारे कार्यकर्ते खाली उतरून लोकांना बाजूला व्हायला अत्यंत प्रेमाने आदेश देऊ लागले. अनेक वाहन चालकांनी हा एक मार्गी असल्याने त्यांना पलीकडच्या गल्लीतून (अंतर मात्र 20 मीटर) ट्रक नेण्यास सांगितले परंतु त्या कार्यकर्ते मंडळींनी विक्रम आणि वेताळ कथेतील राजा विक्रमाप्रमाणे हट्ट सोडला नाही आणि अत्यंत निग्रहाने ट्रक तसाच विरुद्ध दिशेने नेऊन त्यांच्या आवडत्या जागी उभा केला. अनेक दोन चाकी आणि चार चाकी वाहने त्या छोट्या गल्लीतून अडकून पडत असताना, कशाचीच पर्वा करताना ती खिंड गणरायाच्या साक्षीने त्यांनी पुढील 3 तास लढवली. ढोल ताश्याच्या पथकातील कार्यकर्ते इतके बेहोष होऊन त्यांचे वादन करीत होते की बास. एक गणपती सोडला तर बाकी कोणाकडे ही त्यांचे लक्ष गेले नाही.

माझी पुणे ट्राफिक पोलीसांना नम्र विनंती आहे की त्यांनी या मंडळाचा आणि या पथकाचा जाहीर सत्कार करावा आणि पुढील वर्षीपासून गावातील महत्वाचे रस्ते जसे की कर्वे रोड, लक्ष्मी रोड, शिवाजी रोड आदी ठिकाणी असाच पराक्रम करून रस्ते बंद पडायचे प्रात्यक्षिक द्यायला उद्युक्त करावे. याचा पुरेसा सराव आणि अनुभव मिळाला की पुढे जाऊन पुणे बंगलोर हायवे, पुणे मुंबई हायवे येथे त्यांना त्याची कला सादर करण्याची संधी द्यावी. थोडे दिवस हायवे बंद राहिल्याने फारसा काही फरक पडत नाही.

@मंदार कुलकर्णी
14 
सप्टेंबर
 2018


गणेश विसर्जन

काल मी एक वेगळी पोस्ट सोशल मीडिया वर टाकली होती. विशेष म्हणजे त्या पोस्टला एकाही व्यक्तीने कमेंट केले नाही किंवा लाईक केले नाही. मी स्वतः अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी पुणे शहरातून प्रवास फेरफटका मारला होता आणि प्रत्यक्ष दर्शन करून ही पोस्ट टाकली होती. गणेश विसर्जन म्हणजे सुट्टी आणि चुकूनही घरातून बाहेर पडायचे नाही हे बहुतेक मध्यम वर्गीय किंवा उच्च वर्गीयांनीं ठरवले आहे असे दिसते आहे. एकतर घरात किंवा पुण्याबाहेर असे दोनच पर्याय दिसून येतात. कारण ही त्याला असेच आहे. मुरवणुकीत चालणारा गोंधळ, ढकला ढकली, विशेषतः महिलांशी होणारे असभ्य वर्तन यामुळे बरीच मंडळी त्या दिशेला जातच नाहीत. पण त्यामुळे या लोकांचे फावते हे कोणाच्या लक्षात येते आहे का? रस्त्यावरून बेधुंद होऊन गाड्या चालवणे, मद्यपान करून रस्त्यात धांगडधिंगा घालणे, नशा करून वेड्यासारखे 2 - 2 दिवस मिरवणुकीत भटकत राहणे आणि आपल्या पिताश्रींचा रस्ता असल्यासारखी गुंडगिरी करणे.

या अशा प्रकारच्या दहशतीमुळे दिवसेंदिवस गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, शिवजयंती अशा उत्सवांना बाहेर पडणे अशक्य झाले आहे. यालाच अघोषित संचारबंदी असे म्हणतात. येथे एक नोंद नक्की घ्या, मी स्वतः अण्णाभाऊ साठे व्याख्यान मालेत त्यांच्यावरच एक भाषण फर्ग्युसन महाविद्यालयात केले आहे.

अशा प्रकारच्या दहशतीचे वातावरण असेच चालू राहिले तर वर्षातील निम्मे दिवस आपल्याला घराबाहेर पडणे अशक्य होईल याची आपल्याला कल्पना आहे का? लोकशाहीमध्ये संपूर्ण भारतात कधीही कुठेही फिरण्याचा आणि राहण्याचा जन्मसिद्ध अधिकार आपल्याला दिलेला आहे. पण अशा पद्धतीने दहशतीमुळे कुठे जाण्यास आपल्याला मज्जाव केला जात असेल तर कसे चालेल?

मताच्या लालसेपोटी जर अशा जमवावरती काहीच कारवाई होताना दिसत नाही. समाजातील सुज्ञ व्यक्ती, अधिकारी आणि राजकारणी यांचे या विषयावर काय म्हणणे आहे? ही परिस्थिती बदलण्यासाठी ते काय प्रयत्न करतील?

- मंदार कुलकर्णी
24 सप्टेंबर 2018


पाऊस

पाऊस
मंदार कुलकर्णी
27 
सप्टेंबर 2018

पुण्यातील आजची संध्याकाळशाळा ऑफिस सुटायची वेळदुपारी चार पासूनच अंधारून यायला सुरुवात झालीआणि बरोब्बर 6 च्या ठोक्याला पावसाला सुरुवात झालीपावसाचा जोर इतका होता की 10 फुटावरचे काही दिसेनात्यात भरपूर झाडे पडली आणि अनेक रस्त्यावर वाहतूक थांबलीचाकरनामी मंडळी मग मिळेल तिथून आणि मिळेल तसा रस्ता शोधत आपले घर गाठत होती.

कर्वेनगर मधील भरतकुंज सोसायटी समोरील रस्त्याची हीच अवस्थातेथील ओढ्यावरील पुलावर दोन मोठी झाडे आडवी पडली होतीजवळ जवळ 70 टक्के रस्ता त्यामुळे बंदविशेष म्हणजे सर्व वाहन चालक जोरजोरात हॉर्न वाजवत आपले वाहन पुढे रेटत होतीहळूहळू गर्दी वाढतच होतीपाऊस चालूच होता आणि लोकांचा पेशन्स संपत चालला होतामी ही त्या गर्दीचा एक भाग होतोसाधारण अर्ध्या तासाने त्या चिंचोळ्या जागेतून माझी सुटला झाली आणि विजयी विरासारखे मनात हास्य निर्माण झाले आणि तिथून निघणार एवढ्यात मनात विचार आलामला आज विशेष घाई नाही पण ज्यांना खरच घाई आहेकुठेतरी वेळेत पोहोचायचे आहेमुलांना क्लासहून घ्यायचे आहेत्यांची काय अवस्था झाली असेल?

सरळ गाडी बाजूला लावली आणि झाडाच्या फांद्या बाजूला करायला सुरुवात केलीम्हटलं तर अशक्य काम पण कुणीतरी सुरुवात करायला हवी ना... मोठी फांदी हलेचनामग आजूबाजूच्या छोट्या फांद्या तोडायला सुरुवात केलीथोडं थोडं करत 10 टक्के रस्ता मोकळा झालालोक अत्यंत निर्विकारपणे माझ्या बाजूने निघून जात होतेकोणाला मी करत असलेल्या कामाची पर्वा आणि फिकीर नव्हतीभर पावसात कोणीतरी रस्ता मोकळा करायचं काम करतंय हे दिसत असूनही "आपल्याला काय त्याचंअसा आविर्भाव दर्शवत लोक मलाच हॉर्न वाजवत निघून जात होते.

साधारण 15 मिनिटांनी एक जण माझ्या जवळ आला आणि काही  बोलता फांद्या बाजूला करू लागलापुन्हा अंगात बळ आलंनवा उत्साह आलाइतक्यात अजून एक गाडी बाजूला घेऊन आमच्यात आलाआता ठरलंकाम फत्ते होणारचआणि म्हणता म्हणता आम्ही तिघांनी पूर्ण रस्ता मोकळा केलाझाडाबरोबर आलेल्या केबल बाजूला करणे अजून जिकिरीचे काम पण तोही गुंता हळूहळू सोडवलारस्ता वाहता झाला....

एवढ्या गदारोळात ज्यांनी मला  बोलता मदत केली त्यांची नावंच विचारायची राहून गेली... आपण पुण्याचे सुजाण नागरिक म्हणवतो मग इतकं काम आपण करायला नको कावाईट अजून एक गोष्टीचं वाटलंकेवळ 50 मीटर वर असलेल्या अलंकार पोलीस चौकीला याची गंधवार्ता नव्हतीपोलीस मित्र म्हणायला जीभ जड जाते ती याच साठी....