स्थळ: कुलश्री सोसायटी
गाव: कर्वे नगर
शहर: अर्थातच पुणे
गेले 2 महिने ड्रेनेज चे काम रस्त्यावर चालू होते. पूर्ण रस्ता बंद त्यामुळे आमच्या सारख्या रोजचा रस्ता असणाऱ्या मंडळींना पर्यायी लांबचा रस्ता वापरावा लागत होता. आज ना उद्या या रस्त्याचे काम पूर्ण होईल आणि परत रस्त्याचे डांबरीकरण झाल्यावर पुढची काही वर्षे तरी खराब रस्त्यावरून जावे लागणार नाही याचा मनोमन आनंद होता.
अखेर गेल्या आठवड्यात ती घटिका आली. काम पूर्ण झाले, डांबराची पिंपे आली आणि आणि दोनच दिवसात सुरेख रस्ता तयार झाला. खरं सांगायचं तर आमच्या अपेक्षेपेक्षा जरा लवकरच. दुसऱ्या दिवसापासून नवीन रस्त्यावरून जाता येणार या आनंदात असताना एक महाशयांनी लगेचच त्या रस्त्यावर कुदळ मारून त्याचे कोणते तरी पाईप लाईन चे काम चालू केले.
याला बिनडोकपणा म्हणायचं नाहीतर काय? दोन महिने काय यांनी झोपा काढल्या का?
माझी विनंती आहे, की जसे इतर मेसेज आपण 50 जणांना पुढे पाठवतो तसेच हा मेसेज कुलश्री सोसायटी मधील त्या महाशयांना पोहोचू द्या. आले अंगावर तर मी आहेच शिंगावर घ्यायला....
मंदार कुलकर्णी
30 मार्च 2019

No comments:
Post a Comment