Followers

Tuesday, May 19, 2020

सुट्टी आहे तर कोकणात, समुद्रकाठी जाऊया का

प्रिय पुणेकर आणि मुंबईकर, सध्या पुण्यातील आणि पुण्याबाहेर जाणारे अनेक रस्ते तसेच मुंबई आणि मुंबई बाहेर जाणारे रस्ते सध्या कोरोना नियंत्रण करण्यासाठी बंद करून केले आहेत. उदा. चांदणी चौकातून मुळशी किंवा बावधन कडे जाणारे रस्ते पत्रे मारून बंद केले आहेत, आणि तिथे पोलीस पहारे आहेत. तिथून जाता येणं अशक्य आहे. असे अनेक रस्ते पुण्याच्या चारी दिशांना बंद केले आहेत. कृपया घरात वेळ जात नाही, कंटाळा आला आहे म्हणून मी जरा चक्कर मारून येतो किंवा लॉंग ड्राईव्ह करून येतो, असा विचार मनातही आणू नका. सध्या अनेक जण 'सुट्टी आहे तर कोकणात, समुद्रकाठी जाऊया का' असा विचार करत आहेत. कृपया लक्षात घ्या, कोरोनाचे पेशंट पुणे आणि मुंबई याच गावात सर्वात जास्त आहेत. सुदैवाने कोकणात जास्त प्रादुर्भाव नाहीये. म्हणूनच मुंबईकर आणि पुणेकरांनी काही झाले तरी कोकणात जाण्याचा विचार करू नये. कोकणची सहल आपण पुढील वर्षी करू शकतो, पण आता कोरोना सगळीकडे नियंत्रणात आणणे आणि ठेवणे हे सर्वात जास्त महत्वाचे काम आहे. आपले माननीय मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल त्यांच्या भाषणात हीच गोष्ट प्रकर्षाने सांगितली. आहे तो रेड झोन हिरवा करणे आणि हिरवा झोन कोरोना मुक्त ठेवणे हीच आपणा सर्वांची सध्या सर्वात मोठी जबाबदारी आहे. कोकणातील आपल्या बांधवांना निरोगी आणि कोरोनामुक्त राहुद्या आणि सध्या त्यांना आंब्याचा व्यवसाय अत्यंत काळजीपूर्वक आणि स्वतःची काळजी घेऊन निर्धोकपणे करू द्या. आपण सारे नागरिक या लढाईमध्ये उगाचच प्रवास टाळू या. आपल्या घरात थांबून केंद्र आणि राज्य सरकारला अशा पद्धतीने मदत करू या आणि कोरोनाचा प्रसार टाळू या. हा मेसेज शक्य असेल तर आपल्या ओळखीच्या लोकांना अवश्य पुढे पाठवा. धन्यवाद... - मंदार कुलकर्णी १९ मे २०२० 🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment