Followers

Saturday, February 28, 2015

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
खरंच राहिली आहे का महाराष्ट्रात मराठी.... धृ.

अमृताचेही पैजा जिंके अशी आपली भाषा
नामदेवापासुन सर्व संतांनी दिला वेगळी परिभाषा
सातवाहनापासून शिवाजी पर्यन्त बोलली गेली ती मराठी .... 1

ज्ञांनोबाची ज्ञानेश्वरी आणि तुकारामाच्या गाथा
संस्कृतची धाकटी बहीण म्हणून आम्ही टेकतो माथा
दोन हजार वर्ष जुनी आहे आपली भाषा मराठी .... 2

टिळक, गोखले, रानडे, कर्वे, सावरकर यांची ही मराठी
अत्रे, तांबे, गोनी, फडके, पुलं, कुसुमाग्रज यांची ही मराठी
का मग झगडावे लागते अभिजात दर्जा मिळण्यासाठी .... 3

इंग्रजांची सत्ता बरी इतके इंग्रजीचे आक्रमण झाले आहे
हिंजवडी चं हिंजेवाडी आणि तळवडे चं तलवडे ही तर नुसती सुरुवात आहे
दोन मराठी लोक बोलतात फक्त हिन्दी, ना मराठी  .... 4

शुद्ध मराठी वाक्य बोलणारी माणसं आज सापडत नाहीत
मराठी माध्यमाच्या शाळांत आज विद्यार्थीच उरले नाहीत
अखिल भारतीय सम्मेलने भरवून टिकणार आहे का मराठी.... 5

मराठी भाषा मरत नसते असे नुसते भाषणात म्हणायचे
मनातून मात्र जगाची भाषा इंग्रजीचे गोडवे गात सुटायचे
अशाने फक्त इतिहासात राहील आपली मराठी.... 6  

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
खरंच राहिली आहे का महाराष्ट्रात मराठी....

-        मंदार कुलकर्णी
२७ फेब्रु २०१५ (मराठी भाषा दिन)


No comments:

Post a Comment