सचिन सचिन
सचिन
चा चित्रपट येणार आणि त्यात तो स्वत: काम करणार नाहीये तेव्हाच अन्दाज आला
की ही फ़िल्म नसून डॉक्यूमेंट्री असणार. माझ्या पिढीने सचिन च्या पहिल्या
पाकिस्तान दौऱ्यापासून वानखड़े वरील शेवटच्या बॉलपर्यन्त सर्व काही लाइव
पाहिलेले आहे. मग परत thearure मधे जावून तेच पहावे का हा प्रश्न मला
पडला.
हा चित्रपट सचिन
fans ना आठवणीना ऊजाळा देणारा आहे तर 21 व्या शतकात जन्म झालेल्या पिढीला
सचिन काय चीज आहे/होती हे समजून सांगणारा आहे. सचिनच्या जन्मापासून सुरु
झालेली ही कहाणी, त्याचे बालपण, क्रिकेट प्रशिक्षण, आचरेकर सर, रणजी,
कसोटी, वर्ल्ड कप आणि निवृत्ती येथपर्यन्त क्रमानुसार येते. कथा पुढे
करण्यासाठी सचिनचा आवाज आहे.
मधून मधून अंजली, हर्षा भोगले, आणि अनेक क्रिकेटर यांचा दृकश्राव्य वापर केला आहे.
येथे
कुठलिही गोष्ट विसरलेली नाहीये पण हा एकन्दरित प्राथमिक शाळेत लिहिलेला
निबंध झाला आहे. यात कुठेही नाट्य नाही, कुठे माहित नसलेली गोष्ट नाहीये.
सर्व कथा एकाच वेगाने आणि ठरलेल्या दिशेने जाते. त्यात नाट्यमयता असायला
हवी होती. सचिन च्या 25 वर्षाच्या क्रिकेट करियरमधे अशा अनेक चांगल्या वाईट
घटना असतील पण त्या दाखवलेल्या नाहीत. संजय मांजरेकर चा साधा उल्लेखही
येथे नाही. कुठेही वाद, चर्चा होवू नये हा उद्देश येथे स्पष्ट जाणवतो.
त्यामुळे हा चित्रपट रिटायरमेंट चे भाषण किंवा एकषष्ठी वा 75 वा वाढदिवसाचे
भाषण बनतो. सगळेच तेथे चांगले, छान छान असेच बोलतात.
सचिनचे
कर्णधारपद काढून घेतले तेव्हा ते जाणारच होते. पण येथे सचिनने ते मान्य न
करता त्याची बाजू मांडली आहे. अशा अनेक गोष्टी. सचिनच्या झालेल्या चुका या
निमित्ताने त्याने मान्य केल्या असत्या तर तो अजून मोठा झाला असता.
या निमित्ताने न राहवून याची 'धोनी' चित्रपटाशी तुलना होते. चित्रपट म्हणून धोनी खूपच उजवा आहे...
रेहमान चे संगीत असून नसल्या सारखे आहे.
जर तुम्ही सचिन चे खरे पंखे असाल तरच मल्टीप्लेक्स ला जावून हा चित्रपट पहा. जरी टैक्स फ्री असला तरी....
मंदार कुलकर्णी
2 जून 2017
No comments:
Post a Comment