नोटबंदी ला आज एक वर्ष झालं
कोणाची असलेली संपत्ती गेली
कोणाची नसलेली संपत्ती गेली
पाचशे हजार च्या नोटांची किंमत शून्य झाली
दोन हजार साठी दोन दोन तास रांगेत उभे राहायची वेळ आली
आपलेच पैसे मिळवताना लोकांची परवड झाली
कोणी स्वतः च्या खात्यात पैसे भरले
कोणी दुसऱ्याच्या, 30-70 ची बोलणी झाली
काहींनी 3 वर्षासाठी बिनव्याजी कर्ज दिली
बाकी कशाला, 50 लाख bp ने दरवर्षी मरणाऱ्या या देशात 120 लोक रांगेत उभी राहून मेली
काहींना वाटलं, नोटबंदी उठेल,
मोदी माघार घेतील, पण तसे झाले नाही
मग हळू हळू 50 दिवस सरले, 2000 ची नोट मिळायला लागली
TRP मिळेना म्हणून मीडिया ही दुसरे बकरे शोधू लागली
पण यातून नक्की झालं काय?
काश्मिरातील भाडोत्री दगडफेक बंद झाली
निवडणुकांना आदल्या रात्री दिला जाणारा पैसा कमी झाला
काळ्या पैशाची समांतर अर्थ व्यवस्था कमी झाली
अनेक जण कर भरायला लागले
अजून काय हवं?
सामान्य माणूस म्हणतो, थोडा त्रास झाला, झळा बसल्या, पण
झालं ते चांगलंच झालं
झालं ते चांगलंच झालं....
मंदार कुलकर्णी
8 नोव्हेंबर 2017
No comments:
Post a Comment