डार्विन चा सिद्धांत आणि दशावतार
आपल्याकडे पत्रकारांना आणि लोकांना काहींना काही चर्चेला रोज खाद्य हवे असते. मीडिया त्याला TRP असे म्हणते. सध्या चर्चेत आहे तो म्हणजे डार्विनच्या सिद्धांतावर कोणीतरी काहीतरी केलेले वक्तव्य. बाकी विषय तसा महत्वाचा नाही पण माणूस हा माकडापासून बनला हा एक त्यातील मुद्दा आहे.
याचा थोडा वेगळ्या पद्धतीने विचार होऊ शकतो. हिंदू संस्कृतीमध्ये "विष्णू चे दशावतार" यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे. मासा, कासव, डुक्कर, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी. यातील शेवटचा अवतार कलंकी अजून झाला नाही.
या सर्व अवतारांचा जर बारकाईने अभ्यास केला तर पृथ्वीवरील उत्क्रांती वाद याच्याशी थोडीशी सांगड घालता येते. विष्णूचे पहिले चार अवतार आणि त्याचे सामान्य विशेष असे:
मासा - जलचर
कासव - उभयचर
वराह (डुक्कर) - भूचर पण पाण्यात राहणारा किंवा पाण्यापाशी राहणारा
नरसिंह - अर्धा मनुष्य आणि अर्धा प्राणी (सिंह)
कासव - उभयचर
वराह (डुक्कर) - भूचर पण पाण्यात राहणारा किंवा पाण्यापाशी राहणारा
नरसिंह - अर्धा मनुष्य आणि अर्धा प्राणी (सिंह)
काही sequence लागतो आहे का? जागतिक विज्ञानही मान्य करते की पृथ्वी सूर्यापासून जन्माला आली त्यानंतर थंड होत गेली. काही काळाने त्यावर पाणी आणि मग जीवसृष्टी उत्पन्न झाली. त्याची सुरुवात जलचर प्राण्यापासून झाली. पहिला अवतार मासा हे त्याचेच द्योतक आहे. हळूहळू पृथ्वीवर वातावरण बनले आणि कासवासारखे उभयचर प्राणी जन्माला आले. तद नंतर अजून उत्क्रांती झाल्यावर संपूर्ण जमिनीवर प्राणी जन्माला आले. विष्णूचा तिसरा अवतार वराह हेच दर्शवतो.
मधल्या काळात डायनोसॉर सारखे प्राणी जन्म घेऊन नष्ट झाले.
पुढे नरसिंह अवतार म्हणजे अर्धा सिंह आणि अर्धा मानव हे पुढील उत्क्रांतीच दर्शवतात. रामायणातील हनुमान, वाली, सुग्रीव हे वानर आणि अति हुशार. त्यांनी रामाला लंके पर्यंत सेतू बांधायला आणि रावणाशी युद्धात मदत केली. त्याआधी कमी बुद्धीची वानरे ही प्रजाती असेलच की.
पुढील सर्व अवतार हे मनुष्य देहातील आणि अजून हुशारी असेच दर्शवतात.
यात एक महत्वाचा मुद्दा नोंद घेण्यासारखा आहे की विष्णू चे पुढील अवतार झाले, उत्क्रांती झाली पण आधीचे जलचर, उभयचर आणि भूचर हे नष्ट झाले नाहीत. किंवा त्यांना कायमचे हात, पाय अथवा पंख फुटले नाहीत. ते तसेच राहिले.
रामायणात रामभक्त हनुमान पुढे चिरंजीव होऊन रामाबरोबर होता पण राम 'नरच' राहिला आणि हनुमान 'वानर च' राहिला. आजही मासे, कासव ही सर्व प्राणी सृष्टी तशीच आहे.
डार्विन चा उत्क्रांतिवादाच्या मर्यादा येथे स्पष्ट होतात. माकडापासून मानव बनला हा त्याचा शोध येथे अयोग्य ठरतो. चिंपानझी हे कितीही हुशार माकड असले तरी जोवर ते माणसासारखे बोलणार नाही, विचार करणार नाही, तोवर तर वानरच राहणार.
कदाचित कलंकी हा अवतार Super Human असा असू शकेल जो विज्ञानाचा मदतीने अनेक अनाकलनीय आणि अतर्क्य गोष्टी करू शकेल. त्या कोणत्या हे कालच सांगेल...
पटतंय ना?
- मंदार कुलकर्णी
22 जाने 2018
22 जाने 2018
Perfect...
ReplyDelete