Followers

Friday, May 25, 2018

ढग (मुक्त काव्य)


ढग (मुक्त काव्य)


आज खूप दिवसांनी ढगांकडे पहावेसे वाटतंय
त्याच्या नव नवीन छटा, प्रताप ऐकावेसे वाटतंय... १

आज ढगांनी तर जणू कमालच केली
दिवसभर सूर्य दर्शन काही दिलं नाही
आकाश नुसतं भरून आलंय, कोंदट झालंय
"रेन रेन गो अवे" असं म्हणावसं वाटतंय... २

आजचा दिवस फक्त पावसाचा आहे
ढग गडगडण्यावाचून दुसरा आवाजच नाहीये,
विजांचा कडकडाट आणि प्रचंड पाऊस आहे,
ओल्या भिंतीलाही आज बुरशी जमली आहे... ३

आज ढग जणू गायबच जणू उभा राहिलाय काळ,
निम्मा पावसाळा संपला तरी अजून चालू आहे दुष्काळ,
शेतकरी कावला आहे आणि पावसाची चातकासारखी पाहतोय वाट 
मोकळ्या आकाशाकडे पाहत अश्रूंना करून देतो आहे वाट... ४

आज श्रावण सरी पडून गेल्या आणि सुरू झालाय ऊन पावसाचा खेळ,
ढग म्हणत आहेत आज जरा उसंत घेऊ, 
पानाफुलांना थोडा सूर्य प्रकाश देऊ,
कुंद वातावरणातून बाहेर पडायला आहेत हेच ढग... ५

आज ढग आकाशात नुसतेच रेंगाळताहेत,
निळं आकाश मोकळे दिसू नये एवढाच त्यांचा उद्देश आहे,
जणू पांढरा कापूस पिंजून ठेवला आहे चोहीकडे,
आलाय वाऱ्याचा झोत तर रमताहेत इकडे तिकडे... ६

आज ढग अडकले आहेत डोंगरांमध्ये,
पुढे जावे तर जड झाले आहे ओझे त्यांना,
मग बरसतात बिचारे डोंगराच्या दरीमध्ये,
मोकळे होऊन जातात तिथेच पुढच्या प्रवासासाठी... ७

मंदार कुलकर्णी
१५ मे २०१८


No comments:

Post a Comment