आईस्क्रीम
आईस्क्रीम हा युरोप ट्रिप मधला एक अविभाज्य भाग आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्यांना चहा आणि कॉफीची सवय आहे त्यांची थोडी गोची होते पण आईस्क्रीम न आवडणारा माणूस तसा विरळाच. भारतात उगीचच "थंडीत आईस्क्रीम काय खातो, घसा धरेल" वगैरे उपदेश घेऊन आलेली मंडळी इथे यथेच्च आईस्क्रीम खातात आणि त्यांना काही होत नाही. भारतात आग्रहाचं आईस्क्रीम खाल्यावर आठवणीने गरम पाणी पिणारी असंख्य लोकं मी पाहिली आहेत. युरोपच्या हवेची जादूच अशी आहे आहे की कोणालाही काहीही त्रास होत नाही.
तेव्हा रोज आईस्क्रीम खा आणि धमाल करा...
मंदार कुलकर्णी
14 मे 2018

No comments:
Post a Comment