निवडणूक काळात अशी यमक जुळवलेली आणि पटकन पकड घेणारी वाक्ये टाकली की कसलं भारी वाटतं ना? गेल्या वेळेला 'अबकी बार मोदी सरकार' ही टॅग लाईन होती आणि मोदींनी 272 हा जादुई आकडा हा हा म्हणता पार केला होता. मी काही राजकीय विश्लेषक नाही पण गेल्या निवडणूक निकालाच्या दिवशी जेव्हा अगदी पहिले अंदाज (सध्याचा पॉप्युलर शब्द म्हणजे रुझान) यायला लागले तेव्हा मी एकच इच्छा देवाकडे मागितली होती ती म्हणजे NDA ला बहुमत तर मिळुदेच पण त्यापेक्षा भाजपा ला एकट्याने बहुमत मिळू दे. आणि झालेही तसेच. रुझान जेव्हा 250 च्या गेले आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सह अवघ्या उत्तर भारताने जे भरभरून भाजपा चे उमेदवार निवडून आले आणि त्याचमुळे संपूर्ण बहुमताचा आकडा पार करता आला.
30 वर्षानंतर प्रथमच भारताच्या मतदाराने एका पक्षाला इतकी मते आणि जागा दिल्या होत्या. खरं पाहता 1985 साली जे एका पक्षाला बहुमत मिळाले त्यात काँग्रेसच्या 5 वर्षाच्या कारभारापेक्षा इंदिरा गांधी यांची झालेली हत्या आणि त्याचे त्या सरकारने/ काँग्रेसने केलेलं भांडवल हा सर्वात मोठा मुद्दा होता. एका अगदी नवख्या आणि अनुनभवी माणसाच्या हाती देशाची सर्व सत्ता सोपवली जाणे असे चमत्कार फक्त भारतातच होऊ शकतात. तसाच एक चमत्कार 3 वर्षांपूर्वी केजरीवाल नावाच्या खोटरड्या आणि जोकर व्यक्तीला विधानसभेतील 95% जागा देऊन दिल्लीच्या जनतेने दिला होता. पण असे अपवाद असायचेच. Brexit ला मतदान करणाऱ्या इंग्लंड च्या जनतेला आता परत फेरविचार करायची पाळी आलीच ना?
आता वेळ आली आहे परत मतदानाची. 2019 च्या मतदानाची पहिली फेरी पार पडली पण विरोधी पक्षांनी खोटे बोलणे सोडलेले नाही. 'चौकीदार चोर है' पासून अनिल अंबानीच्या खिशात 30000 कोटी घातले, निरव मोदींच्या घशात 15 लाख कोटी घातले असा अखंड खोटेपणाचा रतीब काँग्रेसने लावला आहे. 35000 कोटींचा सिंचन घोटाळा करणारी मंडळी, यांना 'लाज कशी वाटत नाही' सारख्या उथळ आणि खालच्या पातळीच्या जाहिरातींनी अवघा महाराष्ट्र दणाणून टाकत आहेत. ₹72000 वार्षिक आर्थिक मदत देण्याचे गाजर दाखवून देशभर मत परिवर्तनाचा डाव मोठ्या हुशारीने घातला आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद नसताना लोकांना फुकट बसून आणि काम न करता खायची सवय लावणारी काँग्रेस आणि गेली 70 वर्ष निवडणुका जवळ आल्या की 'गरिबी हटाव' चा नारा देणारी काँग्रेस आता कोणत्याही थराला जाईल अशी परिस्थिती आहे.
2019 मध्ये बाजी जिंकण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीतच आहोत. मोदी, शाह, फडणवीस यांच्यापासून भाजपाचे अनेक नेते जीवाचे रान करत आहेत. पण या वेळचा सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे नव मतदार आणि मतदानाचा टक्का वाढवणे. मोदींनी NRI ना या मतदानात समाविष्ट करायचा भरपूर प्रयत्न केला. NRI त्या त्या देशाच्या एम्बसित जाऊन मतदान करू शकतील असे विधेयक मोदी सरकारने लोकसभेत आणले, ते तेथे पारितही झाले पण काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे राज्यसभेत मान्यता मिळवू शकले नाही. जोवर राज्यसभेत भाजपा ला बहुमत मिळत नाही तोवर हे विधेयकच काय पण तीन तलाक सारखी असंख्य विधेयके पास होऊ शकत नाहीत. राज्यसभेत संख्या बळ वाढवण्यासाठी लोकसभेत संख्याबळ अजून वाढवणे आवश्यक आहे.
"मतदान हा आपला हक्क आहे" हे नागरिक शास्त्रात शिकलेले वाक्यच आजच्या काळात गैरलागू आहे. "मतदान हे आपले परम कर्तव्य आहे" हे वाक्य वाक्य आता जनामनात रुजवायला हवे. निवडणूक आयोग, सरकार आणि न्यायालय यांनी एकत्र बसून मतदान न करणाऱ्या आणि मतदानाच्या दिवशी सुट्टी काढून ट्रिपला जाणाऱ्या मंडळींना काय शिक्षा करता येईल याचा विचार करायची वेळ आली आहे. लोक बदली झाली, गाव बदललं तरी मतदार यादीतील नाव दुरुस्त करून घेत नाहीत. मतदार यादीत नाव असूनही मतदानाला जात नाहीत, या सारखी शोकांतिका काय असू शकते? निवडणूक आयोग मतदारांना नुसती पाण्याची व्यवस्था करत नाही तर आज मतदात्याच्या लहान मुलांसाठी त्या दिवशी पाळणाघराचीही सोय करत आहे, हे किती जणांना ज्ञात आहे?
आज गरज आहे ती समाज जागृतीची आणि मतदारांना मतदान केंद्रावर ओढून आणायची. आपण सारे यात सहभागी होऊया. मतदानाच्या दिवशी जगातील कित्येक अनिवासी भारतीय स्वतःच्या खर्चाने केवळ त्यांचे एक मत देण्यासाठी हजारो/ लाखो रुपये पदरचे खर्च करून भारतात येत आहेत. निदान त्याची तरी कदर भारतातील घरी बसून मजा करणाऱ्या मतदारांनी करायला हवी. 'मतदान' ह्या शब्दाच्या जागी 'मत देणे' हे Must काम करायला लोकांना प्रवृत्त करायला हवे. ज्यांना आपले मतदान केंद्र माहीत नाही त्यांना माहिती करून देणे, मतदार यादीत नाव शोधून देणे, मतदान केंद्रापर्यंत जेष्ठ नागरिकांना वाहनांची सोय करणे अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येतील.
लक्षात ठेवा, मतदानाचा टक्का वाढला की यश मोदींनाच. यश मोदींना मिळणार आहेच पण त्यासाठी आपण काय खारीचा वाटा उचलू शकतो याचा आपण विचार करूया आणि कामाला लागू या...
चला तर मग,
फिर एक बार, मोदी सरकार !!!!
(ज्यांना ज्यांना शक्य आहे, छे... सर्वांनाच शक्य आहे, हा लेख जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा प्रयत्न करू या. व्हाट्स अँप आणि फेसबुक वर अनुक्रमे फॉरवर्ड आणि शेअर ही बटणे आहेत... 😊)