Followers

Friday, February 7, 2020

गुगल मॅप चालते तरी कसे ?

गुगल मॅप चालते तरी कसे ?

- ©मंदार कुलकर्णी
६ फेब्रुवारी २०२०

मला एक नेहमी प्रश्न पडतो की गुगल मॅप प्रत्येक वेळेस आत्ताचे म्हणजे ताजे रस्त्यावरचे ट्रॅफिक ४ रंगांमध्ये कशा पद्धतीने (रिअल टाइम) दाखवते? उदारणार्थ ट्रॅफिक पूर्ण मोकळे असेल तर हिरवा रंग, थोडीफार गर्दी असेल पिवळा रंग, ट्रॅफिक जास्त प्रमाणात असल्यास लाल रंग त्याचप्रमाणे कुठे अपघात झाला असेल आणि ट्रॅफिक पूर्णपणे थांबले असेल तर तपकिरी रंग. त्यांच्याकडे असे काही भरपूर सॅटेलेट आहेत का ज्यामुळे ते ही सर्व माहिती काही क्षणात संकलित करून त्यावर प्रक्रिया करून लगेचच गुगल साईटवर दाखवते? अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे. मी थोडासा त्याबाबतीत अभ्यास अभ्यास करून पुढील माहिती संकलित करून सर्वांना देत आहे.

गुगल मॅप मुख्यतः दोन प्रकारे माहिती संकलित करून आपल्या वेबसाइटवरती पाठवते. पहिल्या पद्धतीमध्ये मुख्यत: हा ऐतिहासिक डेटा केंव्हा ऐतिहासिक माहिती एकत्र करून ती माहिती गुगल मॅपवर टाकली जाते दुसऱ्या पद्धतीमध्ये आता जो काही डेटा आहे किंवा किंवा जी माहिती आता म्हणजे ताजी उपलब्ध आहे ती माहिती घेऊन या दोन प्रकारची माहिती संकलित करून मॅपवर टाकली जाते.

पूर्वीचे गुगल मॅपचे व्हर्जन्स हे मुख्यत: जुन्या माहितीवर आधारित होते आणि रस्त्यावरती काही सरकारी संस्थांनी किंवा निमसरकारी संस्थांनी  तिथे लावलेल्या सेन्सरकडून येणारी माहिती गुगल मॅप एकत्र करते आणि वेबसाइटवर दाखवते. लेझर आणि इन्फ्रारेड टेक्नॉलॉजीने ही माहिती संकलित करून ती गुगल सर्व्हरला पाठवली जाते आणि त्यानंतर ती माहिती एकत्रित करून त्यावर प्रक्रिया केली जाते.
चालत्या वाहनातून मिळणारा डेटा आणि त्यांच्याकडे असलेल्या ऐतिहासिक डेटा याचे कायमच संकलन करून ही माहिती सर्व्हरवरून लोकांना पुढे पाठवली जाते.

पूर्वी हे सेन्सर मुख्यत: त्या हायवेवर असल्यामुळे हायवे आणि मुख्य रस्त्यांची माहिती गुगल मॅपवर एकाच वेळा अपडेट झालेले आपल्याला पाहायला मिळते परंतु गावातील रस्ते किंमत छोटय़ा खेडेगावातील गल्लीबोळ यांची माहिती संकलित करायचा तंत्रज्ञान आणि कौशल्य हे त्या वेळी गुगल मॅप कडे पुर्णपणे नव्हते.

२००९ मध्ये गुगलने जे नवीन व्हर्जन आणले त्यामध्ये तिने मुख्यत: क्राऊड सोर्सिंग हा मुद्दा विचारात घेतला याचा अर्थ जेवढी जास्त वाहने रस्त्यावर असतील आणि जेवढी जास्त वाहने त्यांचे लोकेशन दाखवत असतील किंवा त्यांचे गुगल मॅप अॅप चालू असेल तेवढी जास्त माहिती गुगल लोकांकडून एकत्र करून त्यांच्याकडे असलेल्या ऐतिहासिक माहितीची संकलित करून त्या पद्धतीने लोकांना अजून खरी माहिती पाठविण्याचा प्रयत्न करते.

आजकाल अनेक लोक गुगल मॅप हे रस्त्यावरून मुख्यत: हायवेवरून वापरत असल्याने अधिकाधिक माहिती गुगलकडे लगोलग येते. त्यामुळे गुगल सुद्धा ही माहिती तातडीने संकलित करून लगेचच ती माहिती गुगल मॅप या त्यांच्या वेबसाइटवर देते ज्यामुळे सर्वच लोकांची खूप मोठय़ा प्रमाणात सोय झाली आहे.

२०१३ मध्ये गुगलने 'वीज' नावाची कंपनी विकत घेतली आणि त्यांच्यामध्ये म्हणजे आपल्या गुगल मॅपमध्ये ह्य़ूमन इलिमेंट म्हणजे माणसांनी किंवा व्यक्तींनी भरायच्या गोष्टी आणि तशी सोय त्यांनी अंतर्भूत केली उदाहरणार्थ हायवेवर काही ट्रॅफिक जाम झाल्यास किंवा अपघात झाला असेल वाहनाला आग लागली असेल तर त्या गोष्टी गुगल वरती ड्रायव्हर किंवा चालक अपडेट करू शकतात. गुगल यापुढे जाऊन अंदाज बांधू शकते की त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना यापुढे किती उशीर होऊ शकतो तुम्ही गुगल पाहू शकता की जिथे अपघात झाला आहे त्या ठिकाणी दोन कार एकमेकांना ठोकल्याचे चित्र दिसते आणि यांच्या बाजूला किती मिनिट ट्रॅफिक स्लो आहे किंवा या रस्त्याने गेला तर किती जास्त वेळ लागू शकतो यांचे लगेचच गणित करून गुगल मॅप आपल्याला दाखवते या पद्धतीने आपण ज्या रस्त्यांनी जातोय त्याच रस्त्याने पुढे जायचे हा काही दुसरा रस्ता घेऊन आपण आपला वेळ वाचवायचा आणि ट्रॅफिकमध्ये अडकायचे नाही याचा निर्णय ड्रायव्हर घेऊ शकतो अशी अनेक चांगली फीचर्स गुगल मॅप ने यांमध्ये आता सध्या अंतर्भूत केली आहेत

गेल्या आठवड्यात ही सगळी फीचर्स नक्की काम करत आहेत ना हे तपासण्यासाठी एका व्यक्तीने खूप मजेशीर प्रयोग केला. त्याने एका टोपलीमध्ये जवळजवळ नव्वद मोबाइल त्या मोबाइलचे लोकेशन चालू ठेवून आणि गुगल मॅप चालू ठेवून भरले. त्याच्यानंतर ती टोपली घेऊन त्याने एका निर्जन रस्त्यावरचा प्रवास एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत केला. हा प्रवास झाल्यानंतर जेव्हा त्याने जेव्हा गुगलवर ची माहिती तपासली तेव्हा त्याला असे लक्षात ले की गुगलचा असा समज झाला कि त्या छोट्याशा रस्त्यावरून नव्वद वाहने किंवा चालक प्रवास करत आहेत आणि अगदी चालायच्या वेगाने ही वाहने पुढे जात आहेत त्याअर्थी या रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात वाहतूक आहे आणि मोठे ट्रॅफिक जाम झाल्यामुळेच तेथील वाहने अगदी चालायच्या वेगाने पुढे जात आहेत आणि त्यांनी तो छोटासा रस्ता गरद तपकिरी रंगांमध्ये दाखवला !!!

ही टेक्नॉलॉजी इतकी चांगली असूनही गुगल मॅपच्या काही प्रमाणांमध्ये सुधारणा करायला अजून वाव उदाहरणार्थ गुगल मॅप जेव्हा सिग्नलला वाहन उभे असते त्या त्यावेळेला त्या ठिकाणी जमा झालेली वाहने किंवा रस्ता हा लाल रंगाने दाखवतो आणि कुठल्या तरी कारणास्तव इथे ट्राफिक थांबले आहे असे गुगल मॅप दाखवते वास्तविक ही सर्व वाहने ट्रॅफिक सिग्नलला थांबली आहेत असे काहीतरी त्यांनी दाखवायला हवे. त्याचप्रमाणे बरेचदा रस्ता असतो पण त्या रस्त्याची कंडीशन ही खूपच वाईट असते. रस्त्यांमध्ये खड्डे असतात किंवा रस्त्याचे डांबरीकरण नीट झालेले नसते पण हे गुगल मॅपचा अजून समजत नाही. गुगल मॅप या पद्धतीने जेव्हा सगळ्यात जवळचा रस्ता दाखवतो तेव्हा तरी या गोष्टींचा विचार करून त्याप्रमाणे लोकांना किंवा ड्रायव्हर मंडळींना हा रस्ता खराब असू शकतो आणि तुम्ही दुसरा चांगला वळसा घालणारा रस्ता घेतला तर काही मिनिटे जास्त लागू शकतील पण खराब रस्त्याने आपल्याला जावे लागणार नाही हे हे गुगलने सांगायला हवे अशा अनेक प्रकारच्या सुधारणा गुगलला अजून करणे शक्य आहे आणि त्या त्यांनी करायला हव्यात. गुगल मॅपची सुरुवात ही मुख्यत: अमेरिकेतील हायवे, त्याच्यानंतर जगभरातील हायवे आणि त्यांच्यानंतर छोट्या गावातील, खेडेगावातील रस्ते असा त्यांचा प्रवास आहे परंतु भारतासारख्या मोठ्या देशात सगळेच रस्ते काही चांगले नसतात किंवा बराच वेळा कच्चे रस्तेही असतात कारण एकतर डांबरीकरणाचे झालेले नसते, निकृष्ट दर्जामुळे निघून गेलेले असते त्यामुळे ड्रायव्हर मंडळींचा यामध्ये गैरसमज होऊ शकतो आणि ते त्याच पद्धतीने त्याच रस्त्यावरून गाडी घेऊन जाऊ शकतात.

गुगल मॅपवर आपल्यासारखे अनेक उत्साही लोक बरीच नवीन माहिती टाकत असतात उदा. काही नवीन तयार झालेले रस्ते किंवा बदललेले रस्ते, बंद झालेले रस्ते, वनवे झालेले रस्ते ही सर्व माहिती बऱ्याच वेळा गुगल अपडेट करायला जास्त वेळ घेते त्यामुळे अनेक लोकांची फसगत होते आणि पुढील चौकांमध्ये पोलिस गाडी अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करतात. लोकांनी जरी सांगितले की मी गुगल मॅप फॉलो करत आहे तरी पोलिस ऐकत नाहीत आणि त्यांच्याकडून जबरी दंड वसूल करतात. यासाठी गुगल मॅप ने पोलिसांबरोबर काही प्रमाणात एकत्र येऊन काम केले आणि त्यांना योग्य ती माहिती वेळीच पुरवली तर यातून निर्माण होणारे गैरसमज कमी होण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment