Followers

Friday, November 14, 2014

दिवा



दिवा 


काल संध्याकाळची गोष्ट. नेहेमी प्रमाणे दमून भागून घराच्या दारात आलो तर घराला कुलूप आणि आसपास सगळीकडे वीज गेलेली. मोबाइलच्या प्रकाशात दार उघडले आणि आत आलो. काळ्या कुट्ट अंधाराचे साम्राज्य घरभर झालेले. आता मेणबत्ती शोधण्यापासून सुरुवात. फारसे लाइट जात नसल्याने आठवणीचे नीट आणि जागेवर मेणबत्ती ठेवायची सवयच मोडलेली. अंधारातच हात पाय धुवून पावले अलगद देवघराकडे वळली. काडेपेटी आणि तेल यांची जागा नक्की ज्ञात असल्याने सरळ देवापाशी दिवाच लावावा असे मनोमन ठरवून कार्यसिद्दी केली. एकदम मन 30 वर्षे मला मागे घेऊन गेले. पळस्पे सारख्या खेड्यात राहत असताना वीज जाण्याचे प्रकार नेहेमीचेच. अशा वेळी सायंकाळी खेळून घरी आल्यावर आई देवापुढे दिवा लावायची आणि मी शुभंकरोती, गणेश स्तोत्र, रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हणायचो. आजही काहीसं तसच वाटलं. एकटाच देवापुढे बसून दिव्याच्या मंद प्रकाशात ही चारही स्तोत्रे मी मोठयाने म्हटली. रोज न म्हणताही सगळी स्तोत्रे अजूनही तोंडपाठ आहेत याचा अभिमान आणि आश्चर्य वाटलं. आईची या वेळी प्रकर्षाने आठवण होते आहे. त्यावेळी एक दिवा देवापाशी आणि दुसरा ओट्यावर ठेऊन तेवढ्याच अपुर्‍या प्रकाशात आई स्वयंपाक करायची आणि नंतर गरम गरम जेवायला वाढायची.
तो मंद दिव्याचा प्रकाश, त्याच्या उजेडात ट्यूब मधल्या रोजच्या उजेडापेक्षा जास्त आधार वाटत होता. पूर्वी रामरक्षा म्हटल्यावर जसा आधार वाटायचा अगदी तसा. ते काही क्षण एकटेपणा वाटला पण यावेळी तो हवा हवासा वाटत होता. अजून काही वेळ असाच देवासमोर बसून राहिलो. अगदी शांत.... आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:साठी, देवासाठी आणि देवासमोर आज आपण किती वेळ देतो.... विचार करूया....

-         मंदार कुलकर्णी
नोव्हेंबर २०१४ 

Monday, November 10, 2014

कालाय तस्मै नम:

              आज सहज विचार करत बसलो होतो. बऱ्याच वेळेला असं वाटते की इतिहासाची पाने परत एकदा मागे फिरवून पाहता आली तर? त्याही पेक्षा परत इतिहासात जाता आला तर कसं वाटेल…. सध्याच्या काही घटनांवरून त्याचा प्रत्यय आला.
              Office मध्ये दशकभरापूर्वी मंडळी ज्या साहेबाला report करायची तसंच आता काही जणांसाठी झालं आहे. रवि शास्त्री परत एकदा भारताच्या क्रिकेट टीम चा Manager झाला आहे. जसा १९९७-९८ मध्ये भा ज पा सत्तेवर आला आणि काँग्रेस विरोधी पक्षात बसत होते तसंच काहीसं परत झालं आहे. माधुरी दिक्षीत परत एकदा वेगळ्या मध्यमाद्वारे का असेना प्रेक्षकांसमोर आली आहे. तुम्हाला आठवतं का …. जेव्हा सर्वात आधी मोबाईल भारतात आले तेव्हा बिर्ला ए टी & टी ने सुंदर जाहिरात केली होती. एक जण दुसऱ्याला सांगत असतो…. "मला सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत या क्रमांकावर फोन करा. ११ ते ५ या क्रमांकावर आणि नंतर घरी या क्रमांकावर…" तर बिर्ला ए टी & टी चा म्हणतो, "मला कधीही मोबाईल वर या क्रमांकावर फोन करा…" नुकताच माझ्या एका मित्राने असाच मेसेज पाठवला… "मी टूर वर असून मला अमेरिकेमध्ये या तारखांमध्ये या क्रमांकावर, यु के मध्ये या तारखांमध्ये या क्रमांकावर आणि नंतर चीन मध्ये या तारखांमध्ये या क्रमांकावर संपर्क साधा… !!!"
               एकेकाळी जेव्हा दूरचित्रवाणी नव्हतं तेव्हा आकाशवाणी हे एकंच माध्यम होतं आज दूरचित्रवाणी असूनही बहुतेक मंडळी FM आकाशवाणीच ऐकतात. पूर्वी अनेकांनी पितळेची भांडी वापरलेली असतील. मधल्या काळात स्टेनलेस स्टील ने पितळेला हद्दपार केलं पण आज लोकं कॉपर बॉटम ची भांडी परत वापरू लागले आहेत. पितळेचे बंब अनेकांची दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत.
कालाय तस्मै नम: …. हेच खरं…
- मंदार कुलकर्णी
२३ ऑगस्ट २०१४

Sunday, October 12, 2014

आल्या निवडणुका आता आल्या निवडणुका

आल्या निवडणुका आता आल्या निवडणुका
लोकशाहीतला मोठा सण लोकसभा निवडणुका ।। धृ ।।

जगातील सर्वात मोठ्ठी लोकशाही आपण टेंभा मिरवतो
आणि निवडणुकीच्या दिवशी सुट्टी म्हणून फिरायला जातो
अशाने मतांचा वाढेल कसा बरं टक्का?… ।। १ ।।

कोट्ट्यावधी खर्च होणार आम्हाला भुलवण्यासाठी
त्याहीपेक्षा जास्त जाणार आद्ल्यारात्री वाटण्यासाठी
मतदारांसाठी पार्ट्या, ट्रिप यावर खर्च होतो नेटका … ।। २ ।।

ऐशी कोटी मतदार करणार आहेत मतदान
राष्ट्रपती मात्र टाकत नाहीत येथे मतांचे दान
लोकशाही मुळातच किडली आहे, मतदार आहे फाटका …. ।। ३ ।।

सभा, रोडशोज, रेलीस यांचा पडेल आता पाऊस
आरोप प्रत्यारोप यांना उठाव मिळेल खरपूस
मिडीयाला पण खायला कुरण मिळेल चार घटका… ।। ४ ।।

"युवराजांना" साधे बोलताही येत नाही
इटलीच्या मातेला हिंदी वाचता येत नाही
इंग्रजीत टाइप केले मात्र पोपटासारखं बोलता येतं
"हत्यारे" आणि "मौत का सौदागर" असे बेधडक सांगता येतं
त्यांच्यावर कधी कारवाई होत नाही
मला इथं लोकशाही कुठं दिसतंच नाही
पन्नास टक्के मतदानात आपण खरी लोकशाही आणणार का?
कधीतरी आपण यांना झटका देणार का?

म्हणून सांगतो मित्रांनो मतदान करूया
आपली लोकशाही आपणच समर्थ बनवूया
घेऊ आता शपथ मतदान करण्याची, वाढवूया मतांचा टक्का …. ।। ५ ।।

- मंदार कुलकर्णी
२८ जून २०१४

Gopinath Munde


लोकनेता एकमेव दिल्लीमध्ये पोहोचला
नभांगणातील एक तारा अचानक निखळला...
गाडगीळांची नवरत्ने ती सर्वच तेजोमय झाली
जनसंघाच्या मुशीतून अलगद बाहेर पडली
त्यातीलच एक रत्न महाराष्ट्रात झळाळलं....१

अंगी नेतृत्व होते बालवयात
सोबत होते महाजन त्यात
संघ भाजपाच्या संस्कार लोकनेता झाला....२

पस्तीस वर्षाची साधना आली आज फळाला
निवडून आली भाजपा बहुमतान दिल्लीला
शपथ घेऊन आता लागायचे होते कामाला ...३

लोकसभेच्या विजयाच्या माळा अजून गळ्यात होत्या
आनंद आणि गुलाल चेहर्‍यावरील तसेच होते
दृष्ट लागली कोणाची पण मृत्यु एकाएकी झेपावला.....३

नभांगणातील एक तारा अचानक निखळला
लोकनेता एकमेव दिल्लीमध्ये पोहोचला
नभांगणातील एक तारा अचानक निखळला....

- मंदार कुलकर्णी

The poem I had written at the time when Gopinath Munde left us in June 2014. During the similar times, my friend Pramod Kamble had done a quick sketch. I was fortunate to get that sketch which goes along with my poem.....

Mandar Kulkarni
15 Sep. 2014

Online Purchasing

Online Purchasing....
Currently there are many offers are continuously running on Online shoping on all the websites. These includes Snapdeal, Amazon, Ebay, Naaptoul etc. Everyday some or the other offers are available at any time. But be careful going forward.
 
Flipkart recently announced The Big Billion Day sale on 6th October 2014 as an equivalent to the Black Friday sale in the USA. Lots of people are excited about it. They claim to give 30%-90% discounts on most products. On flipcart, Swayam Doublesheet which has been consistent at around Rs.1124 for over a month now, has suddenly shot up to Rs.1500. Tomorrow they might show a 30% discount and reduce it to original price.
 
Another example from same company says Van Heusen Slim Fit Men’s trousers which were hovering between Rs.1200 to Rs.1700 in the last 1 month have suddenly shot up to Rs.2200 in just 1 day! Cool technique to show people a huge Rs.500 discount on their favorite trousers on 6th October. This can happen with other websites also.
 
There is a flip side to this issue also. I think, this is one of the best opportunity to attack on current inflation. If we are getting products at the discounted rate of say 30% to 50%, it means that we are getting product much cheaper than its MRP. If we really plan and gather some amount by means of bonus, we can make good online purchases during Diwali which can be used for next 10 to 12 months. More the purchase we do, more the saving we do. There are many planned purchases including music system, TV, furniture etc. which we can get at the best prices.
There are few tips before you go for online purchases:
1. Don't jump to purchase immd. Nothing wrong if we miss offer by few mins.
2. Atleast compare with 3 to 4 online companies.
3. Try to club few items in one purchase. There are many offers like if we purchase more than 1999 or 2999, we can get flat discount of extra 30% on the top of regular offer.
4. Make purchases on cell. This gives additional saving. Snapdeal gives SD cash of Rs. 50 on purchase on mobile above Rs. 1000
5. Pay by credit card to get more time to generate funds but make sure to pay full amount due before last date.
6. Two or three friends can plan for bulk purchase to get additional discounts.
7. Use specialist websites for best comparison. Smartprix.com is the one of the best website of mobile price comparison and purchase.
 
Wish you all a very happy Diwali and happy purchasing.....
 
- Mandar Kulkarni
6 Oct. 2014

Flipkart चा उगम जर पुण्यात झाला असता तर…

flipkart चा उगम जर पुण्यात झाला असता तर…
 
१. वेबसाईट सकाळी ९ ते दुपारी १.३० व सायंकाळी ५ ते रात्री ८.३० पर्यंतच चालू असेल.

२. खरेदी करायची नसल्यास logout करावे, उगाच हे बघ ते बघ करत करत बसू नये. server वरती लोड येतो, तो crash झाल्यास तुमच्याकडून दंड आकारण्यात येइल.

३. एकदा click केलेली वस्तू परत घेतली जाणार नाही.

४. खरेदी करण्याआधी पूर्ण रक्कम द्यावी. cash on delivery सारखे बिन भरवश्याचे व्यवहार आम्ही करत नाही.

५. wishlist मध्ये ३ पेक्षा जास्त वस्तू टाकू नयेत.

६. sale च्या दिवशी तुम्हाला हवी असलेली वस्तू न मिळाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाहि. उगाच नंतर facebook आणि twitter वर नाराजी चे स्वर उमटवू नयेत.

७. एखादी वस्तू आमच्यापेक्षा दुसरीकडे स्वस्त मिळत असेल तर ती तिकडून खुशाल घ्यावी, उगाच आम्हाला त्यांचे उदाहरण देऊ नये.

८. फ्लिप्कार्ट ही धर्मादायी संस्था नाही. येथे काहिही फुकट मिळत नाही. फ्री गिफ्टची ही कोणी अपेक्षा ठेवू नये.

९. एका दिवशी जास्तीत जास्त एकच वस्तू खरेदी करता येईल. जास्त वस्तू हव्या असल्यास जास्त आकार पडेल.

१०. तूप आणि बासुंदी साठी डब्याची पण order टाकावी लागेल. स्टिलचा डबा फुकट मिळणार नाही.

११.फ्लिपकार्ट मधे "एकच भाव". तुलशीबागे सारखी घासाघीस येथे होंत नाही.

१२. वरील सगळ्या आणि आणखी बर्याच conditions apply.
 
संकलन आणि लेखन: मंदार कुलकर्णी
5 Oct 2014

Monday, September 22, 2014

युती आघाडी

युती आघाडी होणार की नाही, आहे अजून अज्ञात
लोकशाही गुंडाळून ठेवली आहे सर्वांनी बासनात..... || धृ. ||

प्रत्येकाचे वेगळे गणित, प्रत्येकाची वेगळी तर्हात
सत्तेसाठी ओढाव्या लागतात अनेकांना नाकदुर्याू
काहीतरी किम्मत ठेवती आहे का त्यांनी आता जनात ... || 1 ||

कोणाचा कोणाला लागत नाहीये आता मेळ
युती आणि आघाडीत चालला आहे पोरखेळ
नक्की काय ते कळत नाही यांच्या मनात .... || 2 ||

शिवसेना म्हणते आम्ही मोठे भाऊ, भाजपा म्हणते तुम्ही प्रादेशिक
स्वबळाची भाषा करून आहेत दोघे अगतिक
जागांच्या रस्सीखेचीत कार्यकर्ता आहे संभ्रमात.... || 3 ||

इकडे दादा आणि बाबांचं अजिबात जमत नाही
निवडून यायची फारशी आशा मनातच उरली नाही
पंधरा वर्षाची सत्ता अशी कशी घालवायची क्षणात.... || 4 ||

सार्या च पक्षांनी करून टाकली आहे लोकशाही स्वस्त
निवडणुकीच्या गोंधळात पक्षनेते आहेत मस्त
सामान्य मतदारांना मोजावी लागतीय त्याची किम्मत.... || 5 ||

- मंदार कुलकर्णी
21 सप्टेंबर 2014

Monday, September 15, 2014

मेरी कोम - चित्रपट


 
      खेळ  विषयावर तसे कमीच चित्रपट आले.  त्याची  सुरुवात झाली तेलगानने.  त्यानंतरचक दे  इंडिया” ने धमाल उडवून दिली.  मग सुरु झाला Sports personalities वर चित्रपट काढायचा सिलसिला. पहिला क्रमांक अर्थात "भाग मिल्खा भाग' हा Flying Sikh मिल्खा सिंग वर आलेला चित्रपट आणि आता आलेलामेरी कोम”.

या चित्रपटाची सुरुवात होते ती गर्भवती मेरी रात्रीच्या वेळी दवाखान्यात जात असताना.  त्याच दरम्यान इंफाळ मध्ये संचार बंदी असते आणि तिथे सुरु होते तिच्या कष्टाची सुरुवात. ती  कशीबशी पोलिसांच्या मदतीने दवाखान्यात पोचते आणि जुळ्यांना जन्म देते. इथे चित्रपट Flash back पद्धतीने पुढे सरकतो. मणिपूर सारख्या ईशान्य भारतातील एका छोट्या राज्यातून हे रत्न सापडणे हे खरं तर अखिल भारतीयांना लागलेली lottary आहे. घरची अत्यंत गरिबी, मजुरी करून पोट भरणारे आई वडिल. तीन मुलांमध्ये थोरली असल्याने घरात करावी लागणारी कामे, गरम डोक्याची आणि अन्याया विरुद्ध मारामारी करणारी मेरी पुढे बॉक्सिंग मध्ये कशी पुढे गेली हे पाहणे हे फारच रोमांचकारी आहे. करियर च्या उंचीवर असताना तिने घेतलेला लग्नाचा निर्णय, तिच्या गुरूंनी केलेला सक्त  विरोध, पुढे झालेली जुळी मुले, त्यांचे संगोपन, या सगळ्यातून परत ग्लोव्ज चढवून परत विजेती झालेली मेरी हा सर कथाभाग चांगला रंगवला आहे.  बॉक्सिंग फेडरेशन पुढे तिला माफी मागायला  लावणे, काहीही खाता बॉक्सिंग साठी उतरणे, लग्न म्हणजे आता करियर संपले असे सदा हिणवणे, मुलांच्या संगोपनात तिची होणारी धावपळ या आणि अशा अनेक गोष्टी डोळ्यात पाणी आणतात.  ईशान्य राज्ये ही कायमच भारतापासून वेगळी असल्याचा केलेला प्रयत्न आणि त्यामुळे होणारी मानसिक घालमेल इथेही प्रकर्षाने जाणवते.

या चित्रपटात सर्वांनीच फार मनापासून कामे केली आहेत. विशेष कौतुक करायचे ते प्रियांका चोप्राचे. खरंतर मेरी कमी उंचीची आणि बारीक चणीची. फक्त ४६ किलो वजनाची. पण प्रियांकाने उंच असूनही तिच्या कष्टाने आणि अभिनयाने या भूमिकेला चार चांद लावले आहेत. कुठेही चित्रपटात अतिशयोक्ती नाही, किंवा अनावश्यक बडबड नाही. सर्व गीतेही चित्रपटाच्या कथेला अनुसरून आणि चपखल अगदी अंगाई गीत सुद्धा.

या चित्रपटाची "भाग मिल्खा भाग" शी तुलना होणारच. पण ती तसे करणे योग्य होणार नाही. मी फक्त एवढेच म्हणेन की फरहान अख्तर जशी मिल्खा सिंग ची भूमिका जगला आहे तद्वत प्रियांका मेरीची.

या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या नवीन पिढीने काही प्रमाणात का होईना खेळ या विषयाकडे गांभीर्याने पाहिले आणि त्यातून काही खेळाडू जन्माला आले तर या चित्रपटाचे सार्थक झाले असेच म्हणता येईल…

-    मंदार कुलकर्णी
9 Sep. 2014

Thursday, July 31, 2014

श्रद्धा आणि अंधश्रध्दा

श्रद्धा आणि अंधश्रध्दा

श्रद्धा आणि अंधश्रद्धेची जरा गफलतच झाली आहे
विज्ञाननिष्ठ पिढी आज पार Confused आहे… ।। धृ. ।।

एकीकडे श्रद्धेचा आलाय मोठा महापूर
पंढरपूर, आळंदी, देहू आणि गाणगापूर
शिर्डी, गोंदवले, शेगाव यात मुळीच मागे नाही
रोजची लाखोंची गर्दी काही केल्या हटत नाही
एवढे कमी म्हणून 'प्रती शिर्डी' गर्दी खेचते आहे
कुठे आणि किती देणगी दुवू असा प्रश्न पडला आहे
पापभीरू माणसांची भीती कुठे कमी होते आहे … ।। १ ।।

दुसरीकडे Status च्या नावाखाली अगदी उलटे चित्र आहे
देवपूजा, जानवे, मुंज म्हणतात सगळे बकवास आहे
ऑफिस मध्ये सर्वांदेखत 'नमस्कार' करायची चोरी झाली आहे
'अंधश्रध्दाळू' 'Backward म्हणायला हे लगेचच तयार आहेत
ख्रिश्चनानी रविवारी चर्च मध्ये जाणे आहे संयुक्तिक
हिंदूंनी देवळात दर्शनाला जाणे म्हणजे ते अगतिक
सगळीकडेच प्रत्येक गोष्टीचा अतिरेक होतो आहे …. ।। २ ।।

या जगात काय योग्य काय अयोग्य हेच कळेनासं झाला आहे
प्रत्येक गोष्ट Status Symbol म्हणून पाहिलं जात आहे
आई वडिलांच्या संस्काराला कचराकुंडी मिळत आहे
अन सारेजण कशाच्याही मागे वहावत जाते आहे
खरं सांगू दोन्ही बाजूंनी आता टोक गाठलं आहे
एकूणच सगळीकडे बराच गोंधळ झाला आहे
चांगलं काय, वाईट काय हे आता कळेनासं झालं आहे … ।। ३ ।।

गंडे, दोरे, ताईत, मंत्र काय खरं आणि काय खोटं आहे
मन:शांतीसाठी झगडावं लागतंय हीच खरी शोकांतिका आहे
प्रलोभनापायी कुठं जावं कुठं थांबावं हेच कळत नाही
सुखी संसाराची व्याख्या आता नजरेसमोर दिसत नाही
दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर प्रयत्न केले
त्यांच्याच खुन्याला शोधण्यासाठी त्यांच्यात आत्म्याची मदत होते आहे
सुशिक्षित समाजाचे हेच विदारक चित्र आहे …. ।। ४ ।।

श्रद्धा आणि अंधश्रद्धेची जरा गफलतच झाली आहे
विज्ञान निष्ठ पिढी आज Confused आहे…
विज्ञान निष्ठ पिढी आज Confused आहे…

- मंदार कुलकर्णी
१२ जुलै २०१४

माझ्या डायरीतील एक पान

माझ्या डायरीतील एक पान -

आज सकाळी आवरून नेहेमीप्रमाणे बसने ऑफिसला जायला निघालो. सकाळी वातावरण जरा ढगाळच होते. पण पावसाचे काही लक्षण दिसत नव्हते. गेले दोन महिने असेच चालू आहे. जून गेला, आता जुलै सरायची पाळी आली तरी पावसाचा पत्ता नाही. असो. बस नेहेमीप्रमाणे सुसाट वाऱ्याच्या गतीने चालू होती. सहज म्हणून बाहेर पाहिले तर डावीकडे ढगांच्या आडून सूर्य जरासं दर्शन देत होता. काही अंतरानंतर एक पावसाची छोटीसी सर शिडकावा करून गेली. सकाळच्या वेळचे गार वातावरण अजून थोडेसे गार झाले. इतक्यात उजव्या बाजूला एक छान सुर्यधनुष्य पाहायला मिळाले. अगदी सुस्पष्ट. साधारण १८० अंशात त्याचे मनोहारी सप्तरंग दिसत होते. मी खिडकीत बसलेलो असल्याने मला ते पूर्ण पाहायला मिळत होते. जणू मी निसर्गाचा एक छान canvas पाहत होतो. मन परत एकदा माझ्या लहानपणात घेऊन गेलं. बालपणी असंच इंद्रधनुष्य पळस्पे येथे अनेक वेळा पाहिल्याचं लख्ख आठवतंय. गम्मत म्हणजे बसबरोबर ते इंद्रधनुष्यही मला साथ करत होतं. जसा चंद्र प्रवासात आपली साथ करतो अगदी तस्सं. एकदा वाटलं फोटो काढावा पण म्हटलं काही गोष्टी फोटोपेक्षा मनात capture केलेल्याच किती छान वाटतात.

असे काही मिनिटे मनोरंजन झाले आणि पुढच्या वळणावर ते इंद्रधनुष्य अंतर्धान पावले. स्वप्नांच्या नगरीतून पुन्हा खऱ्या practical जगात आल्यासारखे वाटले. थोडे वाईट वाटले….  बाकी सारे धावते जग मोबाईल वर गुड मोर्निंग चे मेसेज पाठवण्यात गर्क होते आणि मी निसर्गाच्या या चमत्कृतीचा आनंद घेत पुढील प्रवास करू लागलो.

- मंदार कुलकर्णी
31 Jul 2014