ठिकाण नवसह्याद्री सोसायटी, कर्वेनगर म्हणजे अतिशय विचारी, श्रीमंत असलेली मंडळी राहतात अशी सोसायटी. त्या लोकांना काळाच्या पुढचा विचार करुन तिथे पूर्वी जागा घेतल्याचा अभिमान तर आहेच पण त्या शिवाय सर्व प्रकारच्या वागण्यात आणि बोलण्यात असणारा पुणेरी शिष्ठपणा सुद्धा. तो आजचा विषय नाहीये.
आज सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करताना एक अत्यंत मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. रात्रभर पडलेला पाऊस सकाळी रिमझिम चालूच होता. त्यात एक महाशय अंगावर चक्क रेनकोट घालून कॉर्पोरेशनच्या नळाला पाण्याचा पाईप जोडून त्यांच्या लाडक्या कार ला आंघोळ घालत होते. त्यांचा हा प्रकार बराच वेळ चालू होता...
मला त्यांचा फोटो काढायची तीव्र इच्छा झाली होती पण पाऊस इतका होता की त्यात माझा मोबाईल ओला झाला असता... म्हणून हा एक त्याच्या जवळ जाणारा फोटो लावला आहे.
जगात हुशार लोकांची कमी नाहीये, अति हुषारांची तर नाहीच नाही !!!
- ©मंदार कुलकर्णी
29 जून 2019

No comments:
Post a Comment