जूनपासून ढोल ताशे बडवायचे ग्रुप आमचे जमले
दिवसरात्र कानठळ्या बसवणारा आवाज हेच तर काम आमचे
पोलिसांना सांगायची हिम्मत तर करून दाखवा बरे, कारण... १
श्रावण आला तसा रस्ते खोदाईला सुरुवात झाली
अर्धा पाऊण रस्ता अडवून खांब उभारणी सुरू झाली
रस्ते काय परत कधीतरी दुरुस्त होतील बरे, कारण... २
रस्ते बंद करायचा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे
टिळकांनी अपेक्षित केलेलं हेच तर खरं स्वातंत्र्य आहे
धांगडधिंगा आणि अरेरावी करण्यातच आमचा पुरुषार्थ आहे, कारण... ३
दहा दिवस आता सारे गाव दणाणून सोडू
गल्ल्या, रस्ते सारे एकसाथ बंद पाडू
पोलिसांची काय टाप आम्हाला नडायची आहे, कारण... ४
विसर्जनाचा दिवस तर आमचा हक्काचा दिवस आहे
गुलालामध्ये झिंगून रात्रभर नाचायचे आहे
गणपती बाप्पा बसतील गप्प त्यांना मखरातच कोंबायचे आहे, कारण... ५
मंदार कुलकर्णी
२६ ऑगस्ट २०१९

No comments:
Post a Comment