Followers

Tuesday, February 12, 2019

व्हॅलेंटाईनचं वारं...

व्हॅलेंटाईनचं वारं

VIDEO : व्हॅलेंटाईनचं वारं, मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये अश्लील चाळे-https://lokmat.news18.com/video/kissing-boy-and-girl-captured-in-cctv-footage-of-hydrabad-metro-station-lift-340018.html?fbclid=IwAR3i8kAxYnkSUTxZOoEbR50GwmFSpuDoEK2ZJD9_dNLPjGkCqzah4cgzS0c

हा व्हिडीओ पाहिला आणि अक्षरशः अंगावर काटा आला. सोळावे वरीस धोक्याचं पासून अनेक गाणी चित्रपटात आली आहेत पण कुठे काय करायचे आणि कुठे काय टाळायचं किंवा कुठे संयम ठेवायचा हे आजच्या तरुण पिढीला कोणी शिकवलेले दिसत नाही.

तरुण वय आहे, विरुद्ध सेक्स असलेल्या व्यक्तीबद्दल आकर्षण आहे, अगदी एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती खूपच आवडत असली तरी सार्वजनिक ठिकाणी हे चाळे? मेट्रोच्या लिफ्टमध्ये cctv कॅमेरा असतात याचेही भान या जोडप्याला असू नये? प्रेमाची भूक किंवा तहान या थराला गेली आहे की जमेल तिथे आणि जमेल तेव्हा फक्त सेक्स याचाच विचार करणारी ही पिढी तयार होत आहे काय?

अनेक वर्षांपूर्वी मी पु लं चे पूर्वरंग आणि अपूर्वाई ही पुस्तके वाचली होती. त्या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे की परदेशात त्या काळी (60 चे दशक) ही प्रेमाची भूक किंवा प्रेमाचा वखवखलेपणा इतका दिसतो आहे की बास. प्रत्येक tv वरील जाहिरातीचा शेवट हा "आणि ते दोघे एकत्र नांदू लागले, तद्वत" एकमेकांच्या गळ्यात पडले, त्यांनी एकमेकांना घट्ट मिठ्या मारल्या किंवा त्यांनी एकमेकांना xxx असाच असतो. रस्त्यावरही यापेक्षा फारसे वेगळे दृश्य दिसत नसते. एक मुलगा आणि एक मुलगी हे आपले आजूबाजूचे सारे सत्य आणि विश्व विसरून रस्त्यावर किंवा बागेत ज्या प्रकारच्या प्रणय क्रीडा करतात हे पाहून खरंतर डोळे मिटूनच घ्यायला हवेत...

काही दशकात ही सारी परिस्थिती भारतात इतक्या वेगाने येईल असे वाटले नव्हते. पूर्वीचे संस्कार, संयम, सातच्या आत घरात या गोष्टी जशा कालबाह्य झाल्या आहेत तसेच आता लिव्ह इन रिलेशनशिप मुळे तर बाहेरख्यालीपणा करायचं सुप्रीम कोर्टाकडून उघड उघड परमिट मिळाल्या सारखी परिस्थिती आहे.

आजची कॉलेज मधली पिढी अभ्यास सोडून हेच धंदे करते का? आपले करियर आपले priority त्यांना कळत नाहीत का? व्हॅलेंटाईनचं वारे वाहत असताना साधं, सरळ प्रेम व्यक्त करताच येऊ शकत नाही का? मुळात व्हॅलेंटाईन डे मुळे वाढलेला धंदा याचा विचार करताना किती मुले यामुळे आयुष्यातून उठू शकतात याचा कोणीच का विचार करत नाही? असला धाक तर फ़क्त पोलिसांचा पण मग पोलीस कुठे कुठे पोहोचणार? पालक म्हणून आपली काही जबाबदारी नाही का? का आता या गोष्टी आपण गृहीत धरल्या आहेत?
- मंदार कुलकर्णी

No comments:

Post a Comment