Followers

Wednesday, February 20, 2019

भाजपा शिवसेना जागावाटप

भाजपा शिवसेना जागावाटप

अखेर हो नाही, हो नाही करत शेवटी युती करायचं ठरलं तर. ज्या पक्षाने इतके वर्ष दुसऱ्या पक्षाची उणी दुणी काढली, ज्या पक्षांनी एकमेकांना कायम पाण्यात पाहिले, ज्या पक्षाने एकमेकांना शिव्या देण्याची एकही संधी सोडली नाही, ते परत नांदायला तयार झाले.
उद्धव ठाकरे यांची काही वाक्ये पहा -
1. 25 वर्षे आमची युती मध्ये सडली
2. आम्ही एकटे विधानसभेवर भगवा फडकवणार
3. चौकीदार चोर है
4. हमको पटकने वाला पैदा नही हुवा
5. आता कधीच युती नाही
6. नाणार प्रकल्प रद्द व्हायलाच पाहिजे.
आणि अनेक....

युती करण्यापूर्वी भाजपा ने सामना मधील गेल्या 5 वर्षांचे अग्रलेख वाचायला हवे होते. गेल्या 5 वर्षात केलेले अपमान, हेटाई थोड्या आठवायला हव्या होत्या.

गेल्या लोकसभेत भाजपा ने 23 जागा म्हणजे शिवसेनेपेक्षा 5 जागा जास्त जिंकल्या. मोदी करिष्मा या एकमेव कारणाने शिवसेनेला इतक्या जागा जिंकता आल्या होती. हे न पाहता आता 48 पैकी फक्त 25 जागा लढवणे हा भाजपाचा नैतिक पराभवच आहे. विधानसभा निवडणुकीत 122 जागा म्हणजे शिवसेनेच्या पेक्षा दुप्पट जागा जिंकून आता 50% जागा घेणे हे शिवसेनेपुढे साक्षात लोटांगण घातले आहे.

शिवसेना पक्ष हा काळाबरोबर रसातळाला जात असताना त्याला नव संजीवनी देण्याचे काम या युतीने केले आहे. केवळ 3 विधानसभा निवडणुकीमुळे घाबरून जाऊन भाजपने स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. मोदींच्या करिष्म्याने जर शिवसेनेच्या विधानसभेत जास्त जागा आल्या तर उपमुख्यमंत्रीपद ही फडनवीसांना मिळणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. मोदीनी लोकसभेचा विचार करून हा निर्णय महाराष्ट्र भाजपावर लादला आहे हे स्पष्ट दिसत आहे, त्याची फळे त्यांना भोगावी लागतीलच.

पुन्हा एकदा मोठया भावाचा झालेला राजनैतिक पराभव असेच या निर्णयाचे वर्णन होऊ शकेल...

- मंदार कुलकर्णी

No comments:

Post a Comment