हिंदुधर्म, हिंदुत्व आज भारताला का अत्यावश्यक आहे?
- © मंदार कुलकर्णी
२६ जाने २०२०
अलिकडेच केंद्रातील सरकारने काही शेजारी देशातून परागंदा होऊन भारतात आश्रयाला आलेल्या निर्वासितांना नागरिकत्व बहाल करण्याविषयी कायदा अर्थात CAA संमत केला. राज्य घटनेच्या मर्यादा संभाळून व पालन करून संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा संमत करण्यात आला. त्याला रीतसर राष्ट्रपतींची मान्यताही घेण्यात आलेली आहे. पण असा कायदा आपण आपल्या राज्यात लागूच करणार नसल्याच्या धमक्या अनेक मुख्यमंत्री देत आहेत. खेरीज दोन विधानसभांनी हा कायदा आपल्याला मान्य नसल्याचे प्रस्तावही मंजूर करून घेतले आहेत.
गेले ४० दिवस चालू असलेला CAA विरोध आणि न आलेल्या NRC कायद्यामुळे अख्या भारतातील वातावरण पूर्ण ढवळून निघाले आहे. सुरुवातीला जे एन यु, जामिया मिलिया आणि काही शैक्षणिक संस्थांपर्यंत मर्यादित असलेले हा विरोध देशाच्या अनेक भागात रस्त्यावर होऊ लागला आणि लाठीमार, दगडफेक, अश्रूधुर, अटक सत्र पासून जाळपोळ येथपर्यंत त्याने उग्र रुप धारण केले. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा विषय नीट सांभाळता आला नाही असेही आरोप झाले. पाठोपाठ दिल्लीतील शाहीनबाग येथे गेले अनेक दिवस रस्ता अडवून काही लोक २४ तास, दिवस रात्र या CAA विरुद्ध आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या रहिवाश्यांना यामुळे रोजचा एक ते दीड तास उशीर होतोच आहे पण जानेवारी संपत आला तरी हा विषय काही केल्या थांबत नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासुन राजधानी दिल्लीत शाहीन बाग भागात रस्ते बंद करून या देशविघातक शक्तिंचे धरणे आंदोलन चालु आहे. या कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयातही मंडळी पोहोचली आणि माननीय न्यायालयाने भारत सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी ४ आठवड्याची मुदत दिली आहे. त्या पाठोपाठ केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांनी CAA आपल्या राज्यात लागू करणार नाही अशा प्रकारची वक्तव्ये करून वातावरण अजूनच ढवळून टाकले आहे. आज थांबेल, उद्या थांबेल असे म्हणता म्हणता एकंदरीतच हा विषय न थांबवण्याचा काही लोकांनी आणि पक्षांनी विडाच उचलला आहे असे स्पष्ट दिसते आहे. हळू हळू ह्या सगळ्याचा रोख हिंदू आणि मुस्लिम या वादापर्यंत पोचली आहे. पण पुन्हा एकदा विकलेली मीडिया (sold media) सत्य कधीच दाखवत नाही त्यामुळे दिसते त्यावर विश्वास ठेवून भारतीय सध्या विचार आणि चर्चा करीत आहेत.
दुःखाची गोष्ट ही आहे की जमिया मिलीया वा नेहरू विद्यापीठात हिंसाचार माजवणारे निश्चींत आहेत आणि त्यांच्यावर कशी कारवाई करावी, म्हणून वर्दीतले पोलिसच गडबडलेले आहेत. कारण आता आपली लोकशाही प्रातिनिधीक उरलेली नाही. ती झुंडशाही झालेली आहे. ज्याच्यापाशी मोठी आक्रमक हिंसक झुंड आहे, त्याच्या समोर कायदाही झुकलेला बघायला मिळतो आहे. एका बाजूला प्रशासन भयभीत असताना न्यायालयाने त्याला बळ व धीर द्यायचा, तर तिथेही अनिश्चीतता आहे. घटनेमध्ये संघराज्याची व्यवस्था मांडताना राज्य व केंद्राचे अधिकार वाटून दिलेले आहेत. त्यानुसार नागरिकत्वाच्या बाबतीत केंद्राचा अधिकार निर्विवाद असून, त्यात राज्यांना कुठलीही ढवळाढवळ करण्याची मुभा दिलेली नाही. मग राज्यांचे नेते वा सरकारांनी अशा निर्णय घेणे घटनेच्या कुठल्या तरतुदी वा नियम कायद्यात बसणारे आहे? किंबहूना राज्याच्या विधानसभेने तसा प्रस्ताव करणे व मुख्यमंत्र्यांनी तशा धमक्या देणे, हीच राज्यघटनेची पायमल्ली नाही काय?
हा विषय फक्त १२ डिसेंबर ला लोकसभेत आणलेल्या CAB ने सुरु होत नाही तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी २७०० वर्षे भारताच्या इतिहासात मागे जावे लागेल. वैदिक काळापासून इस पूर्व
६००-७०० च्या आधीपर्यंत काय घडले हे कोणालाच ज्ञात नाही किंवा त्याचा लेखी पुरावा नाही. रामायण आणि महाभारत घडले असावे. जनपद आणि महाजनपद (त्याकाळी अस्तित्वात आलेली छोटी आणि मोठी राज्ये) उदा. कोसला, वत्स, अवंती आणि मगध हा मोठ्या राज्यानंतर मौर्य, अशोक यांनी पुढे भारतातील बहुसंख्य भूभागावर राज्य केले. त्यानंतर शुंग, गुप्त, कुशल, वर्धन अशी अनेक साम्राज्ये राज्य करत होती. नालंदा आणि अनेक विद्यापीठे याच काळातील. चोल, सातवाहन, चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकूट या दक्षिण भारतातील साम्राज्यांनी अनेक दशके नव्हे तर अनेक शतके राज्य केले ते साधारण १३ व्या शतकापर्यंत. चाणाक्ष लोकांच्या हे लक्षात आले असेल की साधारण २००० वर्षाच्या काळात एकाही मुसलमान राजाने भारतात प्रवेश केला नव्हता किंवा राज्य केले नव्हते.
१३ व्या शतकात खलजी, तुघलक, लोधी त्यानंतर मुघल यांनी भारतात प्रवेश केला आणि पुढची ५०० वर्षे भारताच्या बऱ्याचशा भूभागावर राज्य केले. त्यानंतर इंग्रजांनी १३० वर्षे भारतावर राज्य केले. या काळात शिवाजी महाराजांनी आणि नंतर पेशव्यांनी वाढवलेल्या मराठा साम्राज्याचा उल्लेख करणे गरजेचे आहे कारण त्यांनी केलेल्या २०० वर्षाच्या राज्यामुळेच भारताचा इस्लाम देश होण्यापासून वाचला होता. मुद्दा इथे हा आहे की जवळ जवळ ७०० ते ८०० वर्षे आधी मुसलमान आणि नंतर इंग्रज (दोघेही परकीय) यांनी भारताच्या मुख्यतः उत्तर भागावर (मराठा साम्राज्याचा अपवाद वगळता) राज्य केले. १९४७ साली जेव्हा भारत स्वतंत्र करायची आणि इंग्रजांना आपले चंबू गबाळ गुंडाळून स्वदेशी परत जाण्याची वेळ आली तेव्हा हा देश नक्की कोणाचा किंवा कोणत्या धर्माचा हे कोणी ठरवायचे? हे ठरवण्याचा अधिकार काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरू यांना कोणी दिला? देशाची फाळणी केली तेव्हा हे विषय का नाही सोडवले?
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिंधू नदीच्या समृद्ध खोर्यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. काही तज्ज्ञांच्या मते बऱ्याच शब्दामध्ये काळाच्या ओघात बदल होतात, स चा ह झाला आहे, जसे सप्ताह चा हप्ता हा बदल. तद्वत सिंधू नदी पासून दक्षिणेकडे सागराला मिळेपर्यंत चा सर्व भाग म्हणजे सिंधूस्थान किंवा आजच्या भाषेत हिंदुस्तान.
१९४७ साली अखंड हिंदुस्थान दृष्टिपथात असताना केवळ सत्तेसाठी देशाचे ३ तुकडे करणाऱ्या काँग्रेसने पाकिस्तानला मुस्लिम बहुल म्हणून मान्यता दिली पण ८५% हिंदू बहुल म्हणून भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केले नाही. १९५१ च्या जनगणनेच्या नुसार भारतात ८५% हिंदू आणि ९% मुस्लिम होते आणि आज हाच आकडा ८०% हिंदू आणि १८% बनला आहे! भारतातील मुस्लिम लोकसंख्या गेल्या ६७ वर्षात ६ पटीने वाढली आहे. याचा अर्थ लक्षात येतो आहे का सर्वांच्या? हिंदू बहुल देशात हिंदूंचा टक्का त्याच काळात ४ टक्क्याने घसरतो.
आज CAA आणि NRC ला विरोध होतोय याचे एकमेव कारण म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथून येणाऱ्या मुसलमानांचा या कायद्याच्या मध्ये समावेश नाही. भारतातील मुस्लिमांची जनसंख्या या पद्धतीने भराभर वाढवता येणार नाही हे खरे दुःख आहे. त्यासाठी शाहीन बाग येथे २४ तास मुस्लिम महिलांना आणि त्यांच्या मुलांना रस्ता अडवून बसवले गेले आहे आणि त्यांना बसल्या जागी रोज बिर्याणी मिळत आहे. या शिवाय 370 कलम ज्या पद्धतीने काश्मीर मधून काढले आणि मोठ्या नेत्यांची स्थानबद्धता आणि इंटरनेट बँड केल्यामुळे त्यांना याला फारसा विरोध करता आला नाही. तसेच बाबरी मशिदीचा निकालही मुस्लिमांच्या विरुद्ध गेल्याने आणि सर्व देशाने तो निर्णय चांगल्या भावनेने घेतल्याने यांची फारच गोची झाली आहे.
केरळ सारख्या मुस्लिम बहुल राज्यामध्ये हिंदू आता अल्पमतात येत आहेत आणि तेथे केवळ मुस्लिमांसाठी राहायच्या इमारती बांधल्या जात आहेत. काँग्रेसचे युवराज म्हणूनच अमेठी मध्ये पराभव स्पष्ट दिसत असताना केरळ मधील वायनाड मधून लोकसभेत निवडून येतात ते केवळ मुस्लिम बहुल प्रदेश म्हणूनच. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी आपली वोट बँक वाढण्यासाठी लाखो बांग्लादेशी मुसलमानांना हिरव्या पायघड्या घालत आहे आणि त्यांना आधार आणि भारताचे नागरिकत्व देत आहे. काँग्रेसशासित किंवा आघाडी असणारी सर्व राज्ये याच साठी CAA ला विरोध करीत आहेत आणि हा कायदा आमच्या राज्यात लागू होणार नाही अशी दरपोक्ती करीत आहेत.
नुकतेच जितेंद्र आव्हाड नावाच्या एका अत्यंत जातियवादी नेत्याचे भाषण केले त्यात तो म्हणाला की "हिंदु आपले पूर्वज कुठे जाळले गेले ते स्मशान सुध्दा दाखवु शकत नाहीत परंतु मुस्लिम त्यांचे पूर्वज कुठे दफन झाले ते दाखवु शकतात मग हिंदु कसे म्हणु शकतात की हा देश त्यांचा आहे म्हणुन". त्याच्या भाषणात हिंदुंसाठी एक भयावह संदेश दडलेला होता, आजपर्यंत ईतक्या स्पष्टपणे आणी ईतक्या निर्दयपणे कोणीच हिंदुंना हा देश तुमचा नाही हे दाखवले नसेल ,आम्ही म्हणजे कांग्रेस आणी त्यांची पिलावळ (ज्यात आता शिवसेना पण दुर्दैवानी सामील झालीय) हिंदुंची सुतराम फिकीर करीत नाही हे ईतक्या स्पष्टपणे आजपर्यंत कोणी सांगायचे धारिष्ट्य केले नव्हते. एवढी हिंमत या विचारांच्या राजकीय लोकांची वाढली कशामुळे तर आपण हिंदू जे चुप रहातोय ,राज्यांमागुन राज्ये जे बीजेपी आणी पर्यायाने मोदी, शहांच्या हातातुन जात आहेत, CAA, NRC वरून जी आंदोलने पेटविली जात आहेत त्याला हिंदू लोक चुप राहत असल्याने जो जोर चढतो आहे, आपल्या चुप रहाण्याचा अर्थ हे राजकीय लोक असाच काढत आहेत की बहुतांश जनतेचा या कायद्याला विरोध आहे, हिंदु हे असेच स्वार्थी आहेत त्यांच्यात जात, प्रांत यावरून फुट पाडुन आपण केवळ आणी केवळ मुस्लिंमांच्याच मतांवर निवडुन येऊ शकतो.
स्वातंत्र्यानंतर ही हिंदू आणि मुस्लिम यांत फूट पडायचे अनेक प्रयत्न झाले आणि त्यातील बहुतेक योजनांना पाकिस्तानचा पाठिंबा होता. १९ जाने १९९० च्या काळरात्री ४ लाख काश्मीरी हिंदू ना आपला प्रदेश नेसत्या वस्त्रांनीशी सोडावा लागला. जुलै १९८८ मध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेने काश्मीर मधील ९९% हिंदू काश्मीरी पंडितांना देशोधडीला लावून मुस्लिम बहुसंख्य प्रदेश इस्लाम बनवायचा आणि पाकिस्तानला जोडायचा अनेक वर्षे प्रयत्न केला. ५०००० मंदिरे तोडली गेली. काश्मीरी पंडितांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले तर महिला आणि मुलींना बलात्कार करून जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात आले. हे दुःख आज भारतातील हिंदू विसरून गेले आहेत काय?
आज भारतातील तमाम मदरसा मध्ये कोणत्या प्रकारचे आणि कशा प्रकारचे शिक्षण दिले जाते याची कोणालाच कल्पना नाही पण ते शिक्षण धर्मनिरपेक्ष नक्कीच नाही. १९५० ते १९७६ secular हा शब्द भारतीय घटनेत नव्हता. तो घातला मुसलमान धार्जिण्या काँग्रेसने. मुळात या शब्दाची जगभरातील व्याख्या आणि भारतात रुजवली जाणारी व्याख्या वेगळ्या आहेत. धर्म आणि राज्य याचे स्वातंत्र्य म्हणजे धर्म निरपेक्षता पण सोयीस्कर रित्या हिंदू लोकांना त्यांचा धर्मविष्कार करण्यापासून थांबवण्यासाठी हा शब्द गेले अनेक दशके वापरला जातो.
मूळ घटनेत धर्मनिरपेक्ष याची व्याख्या अशी आहे:
१. भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे
२. वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही.
३. सामाजिक व राजकीय जीवनात व्यक्ती-व्यक्तीमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही.
वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनात उपस्थित होणारे प्रश्न सोडविताना त्यांच्याकडे धर्मनिरपेक्ष दृष्टीने, म्हणजेच मानवाच्या ऐहिक कल्याणाच्या दृष्टीकोनातून पाहावे मग हे प्रश्न नीती, शिक्षण, अर्थव्यसस्था, राजकीय व सामाजिक संस्था इ. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातील असोत – या भूमिकेस धर्मनिरपेक्षता म्हणतात. मात्र धर्मनिरपेक्ष म्हणजे अपवित्र, धर्माबद्दल असहिष्णू असे नाही. खरी धर्मनिरपेक्षता म्हणजे एवढेच की, ऐहिक जीवनाची व्यवस्था लावताना धर्मकल्पना अप्रस्तुत होत त्यांच्याऐवजी शास्त्रीय ज्ञान, मानवी मूल्ये आणि विवेकनिष्ठा यांचे साहाय्य घेणे.
धर्मनिरपेक्ष जीवन जगणे म्हणजे धर्माची लुडबुड आपल्या जगण्यात होवू न देणे. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्यांनिच हिंदुराष्टामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बोद्ध, जाट अशी असी साऱ्या धर्मांची रसमिसाळ स्वार्थापोटी करून टाकली. आज आणि गेली ७० वर्षे धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अगदी सोयीस्कर अर्थ सर्व राज्यकर्त्यांनी काढला आहे. मुळातच "मुळमुळीत" असलेली हिंदुच्या मानसिकतेचा वापर (गैरवापर?) करत गांधीनी अहिंसेच्या मार्गाने लढा दिला. अहिंसा,उपोषण, धर्मनिरपेक्षता, शत्रुप्रेम, मवाळपणा असल्या गोष्टी मग आपसुकच हिंदुमधला तो मुळमुळितपणा वाढवायला कारणीभुत ठरल्या असाव्यात आणि हिंदुमध्ये मुळातच असलेल्या सहिष्णूतेचे रुपांतर षंढप्रव्रुत्तित केंव्हा झाले हे आम्हाला कळलेही नाही. धर्मनिरपेक्षतेच्या खोट्या पांघरुनाखालून हिंदू सोडून इतरांनाच खैरात दिली आणि हिंदुसाठी "असली निरपेक्षिता" म्हणजे एक शिवीच झाली आहे. खरे तर "धर्मनिरपेक्षता" ह्या शब्दाची संयुक्तिक व्याख्या परत अधोरेखित व्हायला हवी.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर येथील बहूसंख्य हिंदू आपल्यावर राज्य करतील आणि आपण इंग्रजांच्या गुलामगीरीतून हिंदूंच्या गुलामगिरीत जाऊ अशी भीती उराशी बाळगून मुस्लीम लीग ने भारताच्या फाळणीचा घाट रचला. हिंदू पुढार्यांनीच मुस्लीमांच्या आपण वेगळे आहोत ह्या भावनेला खतपाणी घातले. येथे संदर्भ घ्यायचा असल्यास १९१६ च्या लखनौ कराराचा घ्यावा किंवा खिलाफत आंदोलनाचा घ्यावा. मुळातच मुस्लीमांना आपल्या कोषात रहायला आवडतं. त्यांच्या धर्मात दिलंय तेवढंच हे जग आहे असं ते मानतात. त्यामुळेच त्यांनी आपल्याला कोषात राहता येईल असा देश तयार केला. या लोकांचा कित्येकदा भ्रमनिरास होतो मात्र तरी ते जागे होत नाहित की त्यापासून काही शिकत नाहीत. भारतात सुध्दा त्यांना त्यांच्या कोषातच जगायला मिळाल्यास ते त्यांना हवेच होते आणि आहे. केवळ त्यासाठी त्यांनी आंदोलने केलेली आहेत. वेगळं लॉ बोर्ड मिळवलं आणि आपल्या शैक्षणीक संस्थासुध्दा वेगळ्या त्यातील शि़क्षणाचा व्यवहार पातळीवर कसलाही उपयोग असो अथवा नको मात्र आयुष्याचा महत्वाचा कालखंड ते असा घालवल्यावर कसली आलीये प्रगती? मग आहे त्याच व्यवस्थेचा जीवापाड सांभाळ करायचा. पुढची पीढी सुध्दा याच वाटेवर गेली पाहिजे याची काळजी घ्यावी. आहे तीच मुल्यव्यवस्था कायम राहीली तरच आपलं महत्व कायम राहील ही भीती, कायमच आहे तो कोष जपण्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा देते. मात्र याच वेळी प्रगतीशील भारताचं म्हणून काही धोरण नको होतं का? नकोय का? त्यांनी कोषात राहण्यासाठी आंदोलनं करायची आणि आम्ही त्यांच्या धर्माच्या वेगळं काही केलं तर आपण धर्मनिरपेक्ष ठरणार नाही ही भीती. मग कलम ३७० असो अथवा समान नागरी कायदा असो. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणीही धार्मीक आधारावर वेगळे नको अशी संरचना आवश्यक असतांना मुस्लिम वेगळे का वागतात? धर्म ही तुमच्या व्यक्तीगत आचरणाची बाब आहे आणि सार्वजनिक स्तरावर मात्र कायद्यासमोर सर्वसमान हवेत असं नको का व्हायला?
आज मुस्लिम समुदायाचे ओवेसी सारखे प्रतिनिधी आणि नेते भर सभांमध्ये ज्या पद्धतीने रोज गरळ ओकत आहेत आणि भारत तसेच हिंदू विरोधी बोलत आहेत ते आपण का सहन करतो? कारण एकच. गेले ७० वर्षे हिंदू समाजाला आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल काहीही बोलले तरी तू असहिष्णू आहेस, तू सर्व धर्म समभाव पाळत नाहीस आणि तू धर्म निरपेक्ष नाहीस हेच कायम मनावर ठसवले गेले आहे. पाश्चात्यांचे अनुकरण करताना हिंदू रीती रिवाज, हिंदू धर्मातील मूल्ये याचा सोयीस्कर विसर पडत चालला आहे. मुस्लिमांनी त्यांची टोपी बिनदिक्कत कुठेही वापरायची पण हिंदूंनी साधा कपाळाला तिलक लावला तरी धर्मनिरपेक्ष नाहीत असा आरोप करायला ही राजकीय मंडळी मोकळी. गेल्या शेकडो वर्षात हिंदूंची हजारो मंडळी पाडली गेली, शेकडो देव देवदेवतांच्या मूर्तींची मोडतोड आणि विटंबना करण्यात आली, अनेक ठिकाणी मंदिरांची प्रचंड नासधूस करून तेथे मशिदी बांधल्या गेल्या पण ते हिंदू जनांनी सहन करायचे, आज हज यात्रेला दिली जाणारी कोट्यवधी रुपायाची सबसिडी हे मुस्लिमांचे लांगुल चालन नवे काय?
आज परिस्थिती अशी आहे की आपल्याच देशात हिंदूंना व्यक्त व्हायला बंदी झाली आहे. मुस्लिम काही बोलले की अल्पसंख्याक म्हणून त्यांचा तो अधिकार आणि हिंदू काही व्यक्त झाले की ते कसे धर्मांध असा जाणीवपूर्वक प्रचार आणि प्रसार चालू आहे. हे टाळायचे असेल तर एकच मार्ग... हिंदूंनी जागृत व्हायला हवे. आपला सहिष्णुतेचा बुरखा (हा बुरखा हिंदूंनीच घातला आहे). 'जाऊदे, त्याला काय होतंय?' या प्रवृत्तीमुळे पुढे वाढून ठेवलेल्या भविष्याकडे होत असलेले दुर्लक्ष थांबवायला हवे. आज गरज आहे ती जगभर इंडस ला सिंधू म्हणण्याची, अरबी समुद्राला सिंधू सागर म्हणण्याची आणि इंडियाला हिंदुस्थान म्हणण्याची.
आजचे हे विदारक चित्र बदलण्यासाठी आवश्यकता आहे हिंदू मूल्यांची आणि तीव्र हिंदुत्वाची. आज ज्या पद्धतीने मुस्लिम आपली जनसंख्या वेगवेगळ्या प्रकारे भारतात वाढवत आहेत आणि बाकी ३ देशातील मुस्लिम भारतात आणू पाहत आहेत, त्यावरुनच त्यांच्या पुढच्या चालीची कल्पना आपल्याला आता आली आहे. भारतातील काही मुस्लिम बहुल गावात किंवा वस्ती मध्ये बिगर मुस्लिम लोकांना फिरकणे अशक्य झाले आहे. केरळ मध्ये काही गावात हिंदू माणसाची अंत्ययात्रा काढायला आणि अंत्यसंस्कार करायलाही बंदी आली आहे. CAA च्या आडून बिनदिक्कत बसची जाळपोळ, दगडफेक आणि रास्ता रोको देशभर करणाऱ्या या लोकांना आत्ताच आटोक्यात नाही आणले तर भवितव्य मुश्कील आहे हे मात्र नक्की.
माझी माझ्या समस्त देशबांधवांना विशेष करून हिंदुंना कळकळीची विनंती आहे की सर्वजण जातपात विसरून एक व्हा आणि आपली एकता मोदी, शहाना दाखवा जेथे मत देण्याची वेळ आहे तेथे मते देऊन जेथे मते सध्या द्यायची नाहीत तेथे रस्त्यावर येऊन आपली एकता जगाला दाखवा(आणखीन एक महत्वाचे म्हणजे CAA या कायद्याचा फायदा ज्यांना मिळणार आहे त्यात ऐंशी टक्के दलित बांधवच आहेत आणि तरीही दलित नेते चुप आहेत) , आज जर आपण हे केले नाही तर कदाचित ऊद्या वेळ गेलेली असेल आणी आपले तारणहार कुणिही नसेल परत एकदा झिजिया कर ज्यांनी लादला ते सत्तेवर येतील मग पस्तावण्याशिवाय आपल्या हातात काहिही नसेल. सर्व भारतात या साठी हिंदूंनी आता जागे व्हायला हवे. CAA च्या विरुद्ध १००० लोक मोर्चा काढत असतील तर त्याला समर्थन देणाऱ्या आणि विशेषतः हिंदूंचा ५००० चा मोर्चा निघायला हवा. ही मंडळी जेवढ्या संख्येने रास्ता रोको करून बसले असतील त्याच्या दुप्पट संख्येने आपण हा रास्ता रोको मोडायला हवा. जनसंख्या नियंत्रण कायद्याची तातडीने गरज याचसाठी आहे. हिंदू स्वतःच्या मनाने एक किंवा २ मुले म्हणून थांबली आहेत आणि मुस्लिम समुदाय मात्र त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत.
मित्रांनो, भारतातील वीस टक्के लोक जर एवढा ऊत्पात घडवु शकतात तर उरलेले ऐंशी टक्के लोक शांततेच्या मार्गाने त्यांना विरोध का नाही करू शकत? का हिंदू एक होत नाहीत? लक्षात ठेवा आज जर आपण एक नाही झालो तर उद्या यांच्याच हातुन मरणे एवढेच आपल्या हातात असेल. लवकरात लवकर सावध होणे गरजेचे आहे. आताच जागे नाही झालो तर खऱ्या हरित क्रांती झालेल्या भारतापेक्षा इस्लाम चा हिरवा भारत आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला पहायची वेळ येईल.
टीप: या लेखात मुस्लिम समुदाय म्हणून ज्यांचा उल्लेख केलेला आहे ते मुख्यतः मौलवी, मुस्लिम धर्मांध लोक किंवा अशिक्षित/ वाहवत जाणारे मुस्लिम आहेत. ए पी जे अब्दुल कलाम, झहीर खान, झाकीर हुसेन, मोहम्मद रफी, नौशाद, अझीम प्रेमजी यांच्यासारखे असंख्य भारताचे सुपुत्र या व्याख्येत येत नाहीत.