Followers

Friday, October 4, 2019

आयेगा आनेवाला - लता




आयेगा आनेवाला हे गाणं प्रकाशीत झालं त्याला आज 70 वर्षं झाली. आणि लताला 90 वर्ष... म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी तिने हे अजरामर गीत गायले. किंबहुना काही वर्षे आधीच लताने गायला सुरुवात केली. वयाच्या चौदाव्या वर्षी तिचे वडील गेले आणि सर्व घराची जबाबदारी तिच्यावर आली. सुरुवारीच्या काळात चित्रपटात कामे सुद्धा केली. 'आनंदघन' या नावाने अनेक चित्रपटांना संगीत ही दिले पण लता म्हटलं की डोळ्यासमोर येते ती फक्त 'पार्श्वगायिका'.

साधारण 30 वर्षापूर्वी म्हणजे लताच्य साठीला महाराष्ट्र टाईम्स ने एक सर्व्हे केला होता. "लताची ऑल टाईम ग्रेट 10 गाणी कोणती?" असा तो होता. तेव्हा टीव्ही वर सारखे शो नसत, प्रतियोगीता पोस्टकार्डे यायची होती आणि ऑनलाइन वोटिंग हा प्रकार जन्माला यायचा होता. त्यामुळे या सर्व्हेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. काही हजार लोकांनी पत्रे पाठवून आपले मत नोंदवले होते आणि अर्थातच त्यात सर्वोच्च स्थानावर होते... "आयेगा आनेवाला". मग त्या पाठोपाठ "बिती ना बिताई रैना" आणि अशी असंख्य सुंदर गीते. मी ते पेपर चे कात्रण आता आतापर्यंत जपून ठेवले होते.

माझ्या आठवणीतील लता ही अशी आहे... जिने पुढे "ओ लुटेरे..." सारखी गचाळ गाणी ही गायिली. असो...


मंदार कुलकर्णी
29 सप्टेंबर 2019

No comments:

Post a Comment