Followers

Thursday, October 31, 2019

खरी काँग्रेस, खोटी काँग्रेस



महाराष्ट्र टाईम्स मध्ये "५०  वर्षांपूर्वी" नावाचे एक सदर गेले अनेक वर्षे सुरू आहे. ५० वर्षांपूर्वीच्या त्याच तारखेच्या म टा मध्ये आलेल्या २-३ महत्वाच्या बातम्या येथे छापतात. सध्या १९६९ मधील त्या काळच्या काँग्रेस श्रेष्ठी आणि इंदिरा गांधी यांच्यातील सत्ता संघर्ष याच्या बातम्या येत आहेत. त्या वर्षी राष्ट्रपती उमेदवारी पासून अनेक बाबतीत सत्ताकेंद्र काँग्रेसच्या मुख्य आणि जुन्या जाणत्या लोकांकडून इंदिरा गांधी यांच्या कडे 'साम दाम दंड भेद' या पद्धतीने कसे हलले, हे वाचणे कमालीचे इंटरेस्टिंग आहे. १९५२ ते १९६९ च्या काँग्रेसचे चिन्ह बैल जोडी होते. आहे ती काँग्रेस फोडून "इंदिरा काँग्रेस" बनवून आधीची काँग्रेस याच बाईने संपवली. आणि आपली नवीन काँग्रेस (आय) ही पार्टी बनवली, हा इतिहास आहे.



राहूल, सोनिया यांच्या बरोबर आपण सर्वांनी हा इतिहास वाचायला हवा.

सारांश: १८८५ साली ह्युम यांनी स्थापन केलेली काँग्रेस १९६९ मध्येच संपली आणि आताची काँग्रेस ही केवळ ५० वर्षांपूर्वीची 'इंदिरा काँग्रेस' आहे. तेव्हा त्यांनी "देश की सबसे पुरानी पार्टी" म्हणून गमजा मारू नयेत.

**

मंदार कुलकर्णी
१ नोव्हेंबर २०१९

No comments:

Post a Comment